Join us

Kanda Market : ११७५ कोटींचा कांदा विकत देशात हे कांदा मार्केट टॉपवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:30 IST

Solapur Kanda Market राज्यात नव्हे, देशात सोलापुरातील कांदा मार्केट टॉपवर आहे. एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत अशा नऊ महिन्यांमध्येच ११७५ कोटी रुपयांचा कांदा सोलापुरात विकला गेला आहे.

विठ्ठल खेळगीसोलापूर : राज्यात नव्हे, देशात सोलापुरातील कांदा मार्केट टॉपवर आहे. एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत अशा नऊ महिन्यांमध्येच ११७५ कोटी रुपयांचा कांदा सोलापुरात विकला गेला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत ३ लाख क्विंटल आवक कमी असतानाही उलाढाल अधिक झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते.

सध्या अहिल्यानगर, पुणे, नाशिक, धुळे, सातारा या जिल्ह्यांसह कर्नाटकातील इंडी, विजयपूर, कलबुर्गी, आळंद, बिदर आदी भागात वर्षभर कांदा विक्रीला येतो.

लिलावानंतर तेलंगणा, हैदराबाद, विजयवाडा, जहिराबाद, निजामाबाद, तामिळनाडूमधील चेन्नई, सेडम, कुभकोलम, पोलाची, कर्नाटकातील बंगळुरु, चित्रदुर्ग, तुमकुर, राणीबेन्नूर व कोलकत्ता पर्यंत कांदा जातो.

नऊ महिन्यांत ५ लाख १० हजार २६३ क्विंटल कांदा विक्रीतून ११७५ कोटी ४४ लाख १९ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.

सोलापूरच्या कांद्याने दिवाळीत 'भाव' खाल्ला● ११३९ कोटींची उलाढाल २०२३-२०२४ मध्ये झाली आहे. मागील वर्षी ८ लाख ५ हजार ७५३ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.● तेव्हा दरही सरासरी १६०० रुपये क्विंटल मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी आहे. उलाढाल वाढली आहे. दिवाळीला कांद्याचा चांगला दर मिळाला होता.

यंदा आवक कमी असून दर चांगला मिळाला आहे. गतवर्षी ११३९ कोटींची झाली होती. यंदा नऊ महिन्यात मागील वर्षीचा टप्पा पार केलेला आहे. यंदा साधारण १५०० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. म्हणजे ३०० कोटींची भर पडणार आहे. - दत्तात्रय सूर्यवंशी, सचिव, बाजार समिती

शेतकऱ्यांना अधिक भाव मिळवून देण्याची धडपड व्यापाऱ्यांची असते. मात्र, कधी-कधी दर पडतो. मात्र, इतर बाजार समितीच्या तुलनेत सोलापुरात दर टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. - सहोजात पाटील, कांदा व्यापारी

टॅग्स :कांदासोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीअहिल्यानगर