चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, गाजर आणि टोमॅटोची कमी आवक झाली आहे.
लसणाचे भाव स्थिर राहिले आहेत. चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर आणि मेथीची आवक कमी झाल्याने भाव गडगडले. एकूण उलाढाल ६ कोटी ८० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण ६ हजार ५०० क्विंटल आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने घटली आहे. कांद्याचा कमाल भाव १,७०० रुपयांवरून १,८०० रुपयांवर पोहोचला आहे.
बटाट्याची एकूण आवक ३,००० क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक ५०० क्विंटलने वाढल्याने भावात १०० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव १,३०० रुपयांवरून १,२०० रुपयांवर स्थिरावला.
लसणाची एकूण आवक ४० क्विंटल झाली असून, ही आवक गेल्या शनिवारच्या तुलनेत १० क्विंटलने कमी झाली तरीही लसणाचा कमाल भाव १२ हजार रुपयांवर स्थिरावला आहे.
हिरव्या मिरचीची एकूण आवक २०० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ६ हजार पासून ८,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.
कांदाएकूण आवक - ६,५०० क्विंटलभाव - १,८०० रुपये (कमाल), १,३०० रुपये (कमाल), ७०० रुपये (कमाल).बटाटाएकूण आवक - ३,००० क्विंटल.भाव - १,२०० रुपये (कमाल), २०० रुपये (कमाल), ५०० रुपये (कमाल).
Web Summary : Chakan market saw reduced onion, potato, carrot, and tomato arrivals. Onion prices rose to ₹1,800/quintal. Potato prices dipped slightly despite increased arrivals. Garlic prices remained steady. Total turnover reached ₹6.8 crore.
Web Summary : चाकण मंडी में प्याज, आलू, गाजर और टमाटर की आवक कम हुई। प्याज की कीमतें बढ़कर ₹1,800/क्विंटल हो गईं। आवक बढ़ने के बावजूद आलू की कीमतों में थोड़ी गिरावट आई। लहसुन की कीमतें स्थिर रहीं। कुल कारोबार ₹6.8 करोड़ रहा।