सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी ५६३ ट्रक कांद्याची आवक झाली होती. मंगळवारच्या तुलनेत कमाल दरात १०० रुपयाची घट झाली होती.
प्रतिक्विंटल २७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. सरासरी दरात मात्र १०० रुपयाने वाढ होऊन १२०० रुपये इतका दर मिळाला. कांद्यातून ६ कोटी ७६ लाख रुपयाची उलाढाल झाली.
सध्या कर्नाटकातूनही कांद्याची आवक सुरू झाली आहे. पुढील महिनाभर आवक मोठी राहणार असल्याचे व्यापाऱ्यांतून सांगण्यात आले.
आज मार्केट बंद◼️ आज शौर्य दिन असून, या दिवशी सामूहिक सुटी घेण्याचा निर्णय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हमाल तोलार संघटनेने घेतला आहे.◼️ त्यामुळे गुरुवारी कांदा लिलाव बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली.◼️ गुरुवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव होणार नसल्याचे सांगण्यात आले.◼️ मात्र, अन्य विभागाचे कामकाज आणि लिलाव नेहमीप्रमाणे सुरळीतपणे पार पडतील, अशी माहिती देण्यात आली.
अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यात 'या' २३ कारखान्यांनी अखेर जाहीर केला ३ हजार व त्यापेक्षा अधिक ऊस दर
Web Summary : Solapur market sees onion inflow from Karnataka. Average price increased to ₹1200/quintal, with ₹6.76 crore turnover. Market closed Thursday for Shaurya Din; other departments operate normally.
Web Summary : सोलापुर मंडी में कर्नाटक से प्याज की आवक शुरू। औसत दर बढ़कर ₹1200/क्विंटल, ₹6.76 करोड़ का कारोबार। शौर्य दिवस के लिए गुरुवार को मंडी बंद; अन्य विभाग सामान्य रूप से कार्यरत।