Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : सोलापूर बाजार समितीमध्ये ४१० ट्रक कांद्याची आवक; वाचा काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:58 IST

kanda bajar bhav सोलापूर येथील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ४१० ट्रक कांद्याची आवक झाली.

सोलापूर : येथील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ४१० ट्रक कांद्याची आवक झाली. मंगळवारी किमान १००, कमाल २,०००, तर सर्वसाधारण दर ८५० रुपये असा भाव मिळाला.

८२ हजार १०० पिशव्यातील ४१ हजार ५० क्विंटल कांद्यातून बाजार समितीला मंगळवारी ३ लाख ४८ हजार ९२ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली.

मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ-उतार होत असून, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

अधिक वाचा: राज्यात जमीन महसूल सुनावणी प्रकरणांचा जलद निपटारा होणार; आता नोटीस मिळणार ईमेल द्वारे

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Onion Market Sees 410 Trucks Arrive; Price Fluctuates

Web Summary : Solapur market witnessed 410 trucks of onion arrivals. Prices ranged from ₹100 to ₹2,000, averaging ₹850. The market saw a turnover of ₹34.89 lakh from 41,500 quintals. Increased arrivals reflect good farmer prices despite fluctuating rates.
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेतकरीसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती