Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : सोलापूर बाजार समितीत १५६ ट्रक लाल कांद्याची आवक; वाचा कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:34 IST

kanda market solapur सोलापूर येथील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. दरम्यान, आवक मात्र स्थिरच असल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर : येथील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. दरम्यान, आवक मात्र स्थिरच असल्याचे दिसून येत आहे.

थंडीच्या दिवसातही बाजार समितीमध्ये बुधवारी १५६ लाल तर ७ ट्रक पांढरा कांदा दाखल झाला आहे. किमान दर १००, कमाल दर २३०० तर सर्वसाधारण दर १००० असा मिळाला.

तर पांढऱ्या कांद्याला किमान २००, कमाल ३५०० तर सर्वसाधारण दर १६०० असा दर मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

बुधवारी सोलापूर समितीमध्ये लाल कांद्याच्या ३१ हजार ३९८ पिशव्या दाखल झाल्या आहेत. याची उलाढाल १ कोटी ७२ बाजार लाख ६८ हजार ९०० इतकी झाली.

सध्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे थंडीचा जोर वाढला आहे. रात्रभर कांद्याच्या गाड्या ग्रामीण भागातून बाजार समितीमध्ये दाखल होत आहेत.

शेतकरी आपल्या मालाच्या पिशव्यावर झोपी जात असल्याचे चित्र लोकमतच्या पाहणीत दिसून आले. रात्रभर गाड्यांची ये-जा सुरू असल्याने वाहनांची मोठी गर्दी बाजार समितीमध्ये झाली होती.

सकाळी ६ वाजता कांद्याचा लिलाव सुरू झाला. या लिलावास राज्याच्या विविध भागातून व्यापारी बोली लावण्यासाठी दाखल झाले होते. आवक स्थिर अन् चांगला भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी दिसून आले.

अधिक वाचा: महसूल विभागाचे नवे आदेश, आता सात दिवसांत मिळणार शेतरस्ता; जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Onion Market: 156 Trucks Arrive; Price Details Here

Web Summary : Solapur market sees steady onion arrivals. Red onion fetches ₹100-₹2300, white ₹200-₹3500. 31,398 red onion sacks traded for ₹1.72 crore. Farmers satisfied with prices despite cold. Traders from various regions participated in the auction.
टॅग्स :कांदासोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्डशेतकरी