Join us

Kanda Bajar Bhav : पुणे बाजारात कांदा आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:33 IST

Today Onion Market Price Of Maharashtra : राज्यात आज रविवार (दि.१६) रोजी काही निवडक बाजार समित्यांमध्येच कांद्याची आवक बघावयास मिळाली. ज्यात चिंचवड वाणाच्या कांद्याची ४९३७ क्विंटल, लाल कांद्याची २१ क्विंटल, लोकल कांद्याची २१५६२ क्विंटल आवक झाली होती.

राज्यात आज रविवार (दि.१६) रोजी काही निवडक बाजार समित्यांमध्येच कांद्याची आवक बघावयास मिळाली. ज्यात चिंचवड वाणाच्या कांद्याची ४९३७ क्विंटल, लाल कांद्याची २१ क्विंटल, लोकल कांद्याची २१५६२ क्विंटल आवक झाली होती.

लाल कांद्याला आज भुसावळ येथे कमीत कमी १५०० तर सरासरी ३५०० रुपयांचा दर मिळाला, तर पुणेबाजारामध्ये आवक झालेल्या लोकल कांद्याला पुणे येथे कमीत कमी १५०० सरासरी २५००, पुणे खडकी येथे १६०० तर पुणे मोशी येथे २००० रुपयांचा प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला.

तसेच जुन्नर आळेफाटा येथे आवक झालेल्या चिंचवड कांद्याला कमीत कमी १३०० तर सरासरी ३२०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. 

कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/02/2025
दौंड-केडगाव---क्विंटल416890037002900
सातारा---क्विंटल186100032002100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4937130040103200
भुसावळलालक्विंटल21200025002300
पुणेलोकलक्विंटल21030150035002500
पुणे- खडकीलोकलक्विंटल9120020001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल523100030002000
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीशेतीमार्केट यार्डबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणे