Join us

Kanda Bajar Bhav : कांदा उत्पादकांचा भ्रमनिरास; वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:31 IST

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०३) रोजी एकूण १,०९,३३० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३१,५६८ क्विंटल लाल, १९,४५४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.०१, २४५६ क्विंटल पांढरा, १५०० क्विंटल पोळ, ३१,११४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

गुढीपाडवा, साप्ताहिक सुट्या, रमजान ईद व मार्च अखेरमुळे गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव पूर्ववत सुरू झाले.

तसेच निर्यात शुल्क शून्य केल्याने कांद्याचे दर वाढतील या अपेक्षेने गेल्या आठ दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदाबाजारात आणल्याने सध्या सर्वत्र आवकेत वाढ झाली आहे.

मात्र वाढलेली आवक व देशांतर्गत बाजारपेठेतील घटलेली मागणी यामुळे कांद्याच्या दरात वाढ होण्याऐवजी दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

तर मागील महिन्यात लाल कांद्यासह चालू हंगामातील नवीन (उन्हाळी) कांदा बाजारात येऊ लागल्याने देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली होती. जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव. 

राज्यात आज गुरुवार (दि.०३) रोजी एकूण १,०९,३३० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३१,५६८ क्विंटल लाल, १९,४५४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.०१, २४५६ क्विंटल पांढरा, १५०० क्विंटल पोळ, ३१,११४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर येथे कमीत कमी २०० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. तर कमी आवकेच्या हिंगणा येथे सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला. तसेच उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ६५० तर सरासरी १३०१ रुपयांचा दर मिळाला. 

लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे येथे कमीत कमी ८०० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. तर सांगली येथे १२००, पुणे-खडकी येथे १३००, पुणे-पिंपरी येथे १६५०, मंगळवेढा येथे १३५०, कामठी येथे २००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

तसेच पांढऱ्या कांद्याला आज नागपूर येथे १३००, पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे १३५०, नं.१ कांद्याला कल्याण येथे १७०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/04/2025
कोल्हापूर---क्विंटल609060017001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल391370014001050
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11737100018001400
खेड-चाकण---क्विंटल125120017001400
सातारा---क्विंटल37090018001400
सोलापूरलालक्विंटल2576820020001200
धुळेलालक्विंटल141930013001220
जळगावलालक्विंटल11403771350875
नागपूरलालक्विंटल2240100018001600
मनमाडलालक्विंटल10004021001900
हिंगणालालक्विंटल1200020002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल560470017001200
पुणेलोकलक्विंटल1168480016001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल13100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15160017001650
पुणे-मोशीलोकलक्विंटल88560014001000
मलकापूरलोकलक्विंटल11807001200900
मंगळवेढालोकलक्विंटल4120014501350
कामठीलोकलक्विंटल32150025002000
कल्याणनं. १क्विंटल3160018001700
जळगावपांढराक्विंटल2135001150837
नागपूरपांढराक्विंटल2240100014001300
हिंगणापांढराक्विंटल3200020002000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल150060011761050
येवलाउन्हाळीक्विंटल400050012901150
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100070112611251
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल58150014501325
कळवणउन्हाळीक्विंटल830060016951300
चांदवडउन्हाळीक्विंटल320086114001210
मनमाडउन्हाळीक्विंटल250020013581200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1250065015031301
भुसावळउन्हाळीक्विंटल33100013001200
टॅग्स :कांदाशेतकरीशेती क्षेत्रपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारनाशिकमार्केट यार्ड