Join us

Kanda Bajarbhav : मंचर मार्केटमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 13:17 IST

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला. १६ हजार १०० पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ५३५ या उच्चांकी भावाने विकला गेला आहे.

मंचरःमंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला. १६ हजार १०० पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ५३५ या उच्चांकी भावाने विकला गेला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.

मंचर मुख्य बाजार आवारात मंगळवारी १६ हजार १०० कांदा पिशव्याची आवक झाली. मे. इंदोरे आणि कंपनी आडतदार योगेश इंदोरे यांच्या आडत गाळ्यावर शेतकरी संदीप भगवान थोरात चांडोली खुर्द यांच्या कांद्याला दहा किलोस ५३५ रुपये असा आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळाला.

आवक कमी असल्याने व उत्तर भारतात कांद्याला मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात एवढी उच्चांकी वाढ झाल्याचे बाजार समितीचे सचिव सचिन बोऱ्हाडे यांनी सांगितले.

कांद्याचे दर पुढीलप्रमाणेगोळे कांदे ३३२ पिशवी सुपर लॉट १ नंबर गोळा कांद्यास रुपये ५०० ते ५३५ रुपये, सुपर गोळा कांदे १ नंबर रुपये ४७० ते ५०० रुपये, सुपर मीडियम २ नंबर कांद्यास ४२० ते ४७० रुपये गोल्टी कांद्यास ३५० ते ४२० रुपये, बदला कांद्यास १८० ते ३०० रुपये असा बाजारभाव मिळाला. दरम्यान, या भावाने शेतकरी समाधान व्यक्त करत होते.

टॅग्स :कांदाशेतकरीबाजारमार्केट यार्डमंचरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेती