यंदा कांद्याच्या (Kanda) दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सुरुवातीला कांद्याला प्रतिक्विंटल २४०० रुपये दर मिळत होता, तर सध्या हा दर १८०० ते २००० रुपयांवर स्थिर आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत दरात ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सिंचनाची उत्तम सोय उपलब्ध झाली. (Kanda Bajar Update)
परिणामी, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा आणि मलकापूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यात आली. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून कांदा काढणीला सुरुवात झाली असून, उत्पादन खर्च भरून निघत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (Kanda Bajar Update)
मागील वर्षी याच कालावधीत कांद्याचा दर प्रतिक्विंटल १३०० ते १५०० रुपये होता. यंदा दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ
पुढील काही आठवड्यांत मागणी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे किंमत स्थिर राहिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ टिकून राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
१३० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड
जिल्ह्यात १३० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने घाटाखालील तालुक्यांचा समावेश आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून काही अपवाद वगळता चांगला दर मिळत असल्याने कांदा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
चांगले दर मिळत असल्याने खरीप हंगामात अति पावसामुळे व अल्प दरामुळे झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होणार आहे.
५०० रुपयांची प्रति क्विंटलमागे वाढ
मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याला ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल अधिक दर मिळत आहे. यामुळे उत्पन्नात वाढ झाली असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
अशी झाली वाढ
सन २०२५ मध्ये १८०० ते २००० रुपये
सन २०२४ मध्ये १३०० ते १५०० रुपये
कांदा दरवाढीची कारणे
मागणी व पुरवठ्यातील संतुलन : उत्पादन वाढले असले तरी बाजारात स्थिर दर (Kanda Bajar Update)
मागील वर्षाच्या तुलनेत वाढ : २०२४ : १३००-१५०० रुपये, २०२५: १८००-२००० रुपये
पुरवठा कमी : सद्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे दर वाढले.
शेतकऱ्यांना होणारे फायदे
* उत्पादन खर्च भरून निघत असल्याने दिलासा
* योग्य दर मिळाल्याने आर्थिक स्थैर्य
* पुढील हंगामासाठी अधिक चांगली तयारी शक्य
शेतमाल बाजारात येताच भाव खाली येण्यास सुरुवात होते. हीच परिस्थिती कांद्याचीही असते; मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मागणी चांगली असल्याने शेतकऱ्यांना दरही समाधानकारक मिळत आहे. - गोपाल वानखडे, शेतकरी, खेर्डा.
हे ही वाचा सविस्तर : Wheat Market : गव्हाचे अर्थकारण कसे आहे ते जाणून घ्या सविस्तर