Join us

Kanda Bajar Bhav : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा बाजारभावात काहीशी वाढ; कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:45 IST

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झाली आहे. रविवारी १० किलोला २०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झाली आहे. रविवारी १० किलोला २०० रुपये असा बाजारभाव मिळाला, अशी माहिती सभापती नीलेश स्वामी थोरात यांनी दिली.

१२ हजार ५८९ पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला २०० रुपये या भावाने विकला गेला आहे. मागील आठवड्यात हाच भाव १० किलोला १८० रुपये असा होता.

मंचर बाजार समितीत शेतकरी काढलेला कांदा लगेच विक्रीसाठी आणत आहेत. बाजारभावात किंचितशी वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या बाजारभावाची प्रतीक्षा आहे.

कांद्याचे प्रति दहा किलोचे दरसुपर लॉट १ नंबर गोळा कांदा रुपये १८० ते २०० रुपये.सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये १५० ते १८० रुपये.सुपर मिडीयम २ नंबर कांद्यास १२० ते १५० रुपये.गोल्टी कांद्यास १०० ते १२० रुपये.बदला कांद्यास ५० ते १०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

अधिक वाचा: दुष्काळी माळरानावर सात एकर पेरूची लागवड करत उत्पन्नात मारली कोटीकडे मजल; वाचा सविस्तर

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमंचर