राज्यामध्ये जवळपास सर्वत्र खरिपाच्या पेरण्या सुरु असून कांदा पट्टा असलेल्या नगर, नाशिक जिल्ह्यात काही अंशी शेतकऱ्यांनी लाल कांद्याचे रोपवाटिका तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
तसेच चाळीमध्ये साठवलेला कांदा देखील काही शेतकरी बाजाराचा अंदाज घेत बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन जाताना दिसून येत आहे.
दरम्यान गुरुवार दि. १९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेप्ती उप बाजार समितीत कांद्याची लिलावासाठी एकूण ५१,१८५ गोण्यांची आवक झाली होती.
त्यामध्ये नेप्ती उपबाजार समितीत गुरुवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतिच्या गावरान कांद्याला १६०० ते २००० रुपये भाव मिळाला.
कसा मिळाला भाव?प्रथम प्रतिला १६०० ते २०००द्वितीय प्रतिला १२०० ते १६००तृतीय प्रतिला ५५० ते १२००चतुर्थ प्रतिला २०० ते ५५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
अधिक वाचा: फळपीक विम्यासाठी अर्ज करताय? ह्या दोन गोष्टी करा नाहीतर अर्ज होऊ शकतो रद्द