चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये दिवाळीच्या निमित्ताने झेंडूच्या फुलांची प्रचंड आवक झाल्याने भावात मोठी घसरण झाली आहे.
याउलट, कांदा, बटाटे, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, शेवगा यांची आवक घटल्याने भाव वधारले आहेत.
पालेभाज्यांमध्ये मेथीची आवक कमी झाल्याने भाव वाढले, तर कोथिंबिरीची आवक वाढल्याने भाव घसरले. बाजारातील एकूण उलाढाल ५ कोटी ५० लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,२५० क्विंटल झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत १,७५० क्विंटलने कमी आहे. तरीही कांद्याचा कमाल भाव १,५०० वरून १,४०० रुपये झाला.
बटाट्याची आवक २,२५० क्विंटल झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत २,२५० क्विंटलने कमी आहे. बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपये स्थिर राहिला.
लसणाची आवक ३५ क्विंटल असून, भाव ७,००० रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ३७० क्विंटल असून, भाव ३,००० ते ४,००० रुपये राहिला.
शेतीमालाचे भावकांदाआवक - १,२५० क्विंटल.भाव क्रमांक १) १,४०० रुपये.भाव क्रमांक २) १,००० रुपये.भाव क्रमांक ३) ८०० रुपये.बटाटाआवक - २,२५० क्विंटल.भाव क्रमांक १) २,००० रुपये.भाव क्रमांक २) १,५०० रुपये.भाव क्रमांक ३) १,००० रुपये.
अधिक वाचा: देशात उसाला सर्वाधिक दर देणारे राज्य कोणते? यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात किती मिळेल दर?
Web Summary : Onion prices saw a slight rise in Chakan market, despite reduced supply. Other vegetables like potatoes and garlic also saw stable to increased prices, while flowers slumped due to high supply. Market turnover reached ₹5.5 crore.
Web Summary : चाकन बाजार में प्याज की आपूर्ति घटने के बावजूद कीमतों में मामूली वृद्धि देखी गई। आलू और लहसुन जैसी अन्य सब्जियों की कीमतें भी स्थिर से बढ़ीं, जबकि फूलों की आपूर्ति अधिक होने के कारण कीमतें गिर गईं। बाजार का कारोबार ₹5.5 करोड़ रहा।