चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, कांदा व बटाट्याची विक्रमी आवक झाली.
चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाज्यांचे भाव गडगडले आहेत. चाकणला भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. एकूण उलाढाल ५ कोटी १० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,१०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आतक ६०० क्विंटलने वाढल्याने भावात २०० रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याचा कमाल भाव १,८०० रुपयांवरून १,६०० रुपयांवर स्थिरावला.
बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २५० क्विंटलने वाढल्याने भावात १०० घसरण झाली. बटाट्याचा कमाल भाव २,२०० रुपयांवरून २,१०० रुपयांवर स्थिरावला.
लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. लसणाचा कमाल भावही १० हजार रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक २३० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला पाच हजार रुपयांपासून ते सात हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभावकांदाएकूण आवक - १,१०० क्विंटल.भाव क्रमांक १) १,६०० रुपये.भाव क्रमांक २) १,३०० रुपये.भाव क्रमांक ३) १,००० रुपये.
बटाटाएकूण आवक १,५०० क्विंटल.भाव क्रमांक १) २,१०० रुपये.भाव क्रमांक २) १,५०० रुपये.भाव क्रमांक ३) १,२०० रुपये.
अधिक वाचा: शेतकऱ्यांनो आता फक्त 'हा' ओळख क्रमांक सांगा; अर्जाला मिळेल लगेच मंजुरी