Join us

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांदा बाजारभावात वाढ कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 09:26 IST

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या बाजारभावाचा उच्चांक झाला. दहा किलो कांदा ७०० रुपये या भावाने विकला गेला.

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या बाजारभावाचा उच्चांक झाला. दहा किलो कांदा ७०० रुपये या भावाने विकला गेला असल्याची माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली आहे.

नवीन कांदा बाजारात दाखल झाला असून जुन्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला आहे. त्या तुलनेत नवीन कांद्याला कमी बाजारभाव मिळत आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला गुरुवारी १० किलोला ७०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

तीन हजार ४६५ पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ७०० रुपये या भावाने विकला गेला आहे. शेतकऱ्यांच्या बराखीतील कांदा संपत आला आहे. तसेच नवीन कांद्याचे साधारणपणे ५०० पिशव्यांची बाजार आवारात आवक झाली आहे.

कांद्याचे दर पुढीलप्रमाणेसुपर लॉट १ नंबर गोळ्या कांद्यास रुपये ६५० ते ७०० रुपये.सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये ६३० ते ६५० रुपये.सुपर मीडियम २ नंबर कांद्यास ५५० ते ६३० सुपर रुपये.गोल्टी कांद्यास ३५० ते ४५० रुपये.बदला कांद्यास २५० ते ४०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

नवीन कांद्याचे दरसुपर गोळे कांदे १ नंबर रुपये ५२० ते ५५० रुपये.सुपर मीडियम २ नंबर कांद्यास ३५० ते ५२० रुपये.गोल्टी कांद्यास २०० ते ३५० रुपये.बदला कांद्यास ५० ते १३० रुपये असा बाजारभाव मिळाला.

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डमंचरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी