Join us

Kanda Bajar Bhav : मागील दहा दिवसात कांदा बाजारात मोठी उलथापालथ; कसे राहिले दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 10:30 IST

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १० दिवसांत सर्वसाधारण भाव ३६ रुपये प्रति किलोवरून सोमवारी थेट निम्म्यावर म्हणजे १७ रुपये २५ पैशांवर आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.

योगेश बिडवईमुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले कांद्याचे दर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरायला सुरुवात झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १० दिवसांत सर्वसाधारण भाव ३६ रुपये प्रति किलोवरून सोमवारी थेट निम्म्यावर म्हणजे १७ रुपये २५ पैशांवर आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.

लासलगाव बाजार समितीत काही दिवसांपासून रोज २५ हजार क्विंटल आवक सुरू आहे. सोमवारी कांद्याला क्विंटलला कमीत कमी ७००, तर जास्तीत जास्त २,८५१ रुपये दर मिळाला. १२ डिसेंबरला क्विंटलमागे जास्तीत जास्त ५,००१ रुपये दर मिळाला. सोमवारी २,८५१ रुपये दर मिळाला.

काही दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने सकाळ, संध्याकाळ कीटकनाशक फवारावे लागत आहे. खतांवरही अतिरिक्त खर्च वाढला आहे. मात्र, त्यावर कोणीही बोलत नसल्याचा संताप वाहेगाव साळचे (ता. चांदवड, जि. नाशिक) कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी व्यक्त केला.

कांदा दरात घसरणतारीख - कांदा दर (प्रति क्विंटल/रु.)१२ डिसेंबर - ३,६००१३ डिसेंबर - ३,२००१४ डिसेंबर - २,७००१६ डिसेंबर - २,३५११७ डिसेंबर - २,१००१८ डिसेंबर - १,९००१९ डिसेंबर - १,९००२० डिसेंबर - २,०००२१ डिसेंबर - २,०००२३ डिसेंबर - १,७२५(स्त्रोत: लासलगाव बाजार समिती)

नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा आता बाजारात येत आहे. त्यातच बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे १० दिवसांत कांदा दरात निम्म्यापेक्षा जास्त घसरण झाली आहे. सरकारने २० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डनाशिकशेतकरीमुंबईशेती