खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वाटाणा, हिरवी मिरची व टोमॅटोची आवक कमी झाली. पालेभाज्यांची आवक भरपूर वाढली. एकूण उलाढाल ६ कोटी ६० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ३,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २,५०० क्विंटलने वाढली. कांद्याचा कमाल भाव ६,००० रुपयांवर स्थिरावला, बटाट्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने वाढूनही बटाट्याचा कमाल भाव ३,८०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली. लसणाचा कमाल भाव ३१,००० रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक २२३ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २ हजार ५०० रुपयांपासून ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभावकांदा एकूण आवक ३,५०० क्विंटलभाव क्रमांक १) ६,००० रुपयेभाव क्रमांक २) ४,००० रुपयेभाव क्रमांक ३) २,००० रुपये
बटाटा एकूण आवक २,००० क्विंटलभाव क्रमांक १) ३,८०० रुपयेभाव क्रमांक २) ३,००० रुपयेभाव क्रमांक ३) २,३०० रुपये
अधिक वाचा: Dalimb Niryat Nondani : डाळिंब निर्यातीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू