Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kalingad Market : रमजानमुळे फळ बाजारात कलिंगडाची चलती; वाचा किलोला कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:03 IST

तीव्र उकाडा व रमजान महिना सुरू झाल्यामुळे कलिंगडला मागणी वाढली आहे. तीन दिवसांत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १,९४० टन आवक झाली आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : तीव्र उकाडा व रमजान महिना सुरू झाल्यामुळे कलिंगडला मागणी वाढली आहे. तीन दिवसांत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १,९४० टन आवक झाली आहे.

पुढील संपूर्ण महिना मोठ्या प्रमाणात विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय कलिंगडला आखाती देशातूनही मागणी वाढली आहे.

उन्हाळा सुरू झाला की कलिंगडला मागणी वाढत असते. यावेळेस उन्हाळ्याबरोबर रमजान महिनाही सुरू झाला आहे. यामुळे कलिंगडाच्या मागणीत वाढ होत आहे.

२३ फेब्रुवारीला बाजार समितीमध्ये एकाच दिवशी ७९१ टन आवक झाली होती. मंगळवार, २४ फेब्रुवारीला ५४३ व बुधवारी ६०६ टन आवक होत आहे.

सध्या सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातून आवक होत आहे. ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

५० रुपये किलो भाव◼️ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगड १५ ते ३० रुपये किलो व किरकोळ मार्केटमध्ये ४० ते ५० रुपये किलो दराने विकले जात आहे.◼️ मुंबई, नवी मुंबईसह आखाती देशांमधूनही कलिंगडची मागणी वाढली आहे.◼️ बाजार समितीमध्ये कलिंगडच्या ८० ते १०० वाहनांमधून कलिंगडची आवक सुरू आहे.◼️ दुपारी १२ नंतर कलिंगडच्या वाहनांना मार्केटमध्ये प्रवेश दिला जात आहे. लिलावगृहामध्येही व्यवसायाची व्यवस्था केली आहे.◼️ आवक वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे.

देशात सर्वाधिक उत्पादन होणारी राज्येकलिंगडचे देशातील सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र व झारखंड या दहा राज्यांमध्ये होते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून व कर्नाटकमधून मुंबईत मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.

बाजार समितीमध्ये पश्चिम महाराष्ट्र कर्नाटकमधूनही कलिंगडाची आवक होत आहे. कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे उन्हाळ्यात आवक अजून वाढण्याची शक्यता आहे. कलिंगडला आखाती देशातूनही मागणी आहे. - शिवाजी चव्हाण, कलिंगड व्यापारी

अधिक वाचा: २०१९ नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनाही आता पीएम व नमो किसानचा लाभ मिळण्याची शक्यता; निकष बदलणार? 

English
हिंदी सारांश
Web Title : Watermelon sales surge in Ramadan due to high demand.

Web Summary : Watermelon demand rises in Mumbai due to heat and Ramadan. Market sees 1,940 tons in three days. Prices range from ₹15-₹50 per kg. Exports to Gulf countries are also increasing.
टॅग्स :मार्केट यार्डबाजारफळेपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमुंबईरमजानमहाराष्ट्रकर्नाटकउत्तर प्रदेश