Join us

राज्यात सोयाबीनला हमीभाव मिळतोय का? वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:33 IST

Soybean Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण ८१३३ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात १८ क्विंटल डॅमेज, ८९ क्विंटल हायब्रिड, ५८७३ क्विंटल पिवळा, ९२५ क्विंटल लोकल सोयाबीनचा समावेश होता. 

राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण ८१३३ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात १८ क्विंटल डॅमेज, ८९ क्विंटल हायब्रिड, ५८७३ क्विंटल पिवळा, ९२५ क्विंटल लोकल सोयाबीनचा समावेश होता. 

आज राज्यात सर्वाधिक आवक असलेल्या पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक आवकेच्या लातूर बाजारात कमीत कमी ४३०० तर सरासरी ४४०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच यवतमाळ येथे ४१८५, अकोला येथे ४२५०, चिखली येथे ४०००, लोणार येथे ४२२५, जामखेड येथे ४००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

सिंदखेड राजा येथे आवक झालेल्या डॅमेज सोयाबीनला आज ४२००, पिंपळगाव(ब)-पालखेड येथे हायब्रिड सोयाबीनला ४५५०, लोकल वाणाच्या सोयाबीनला अमरावती येथे ४२४८, नागपूर येथे ४१८३, मेहकर येथे ४३०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

दरम्यान राज्यात कुठेही हमीभाव दिसून येत नाही. सध्या सोयाबीनला व्यापाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे दर मिळत असून त्यामुळे आगामी काळात बाजारात येणाऱ्या सोयाबीनला किमान हमीभाव मिळेल का, हे शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि आशादायक प्रश्न ठरत आहे.   

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सोयाबीन आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/09/2025
लासलगाव - विंचूर---क्विंटल284300045004451
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल9430043004300
माजलगाव---क्विंटल15445144514451
सिन्नर---क्विंटल5430544954400
कारंजा---क्विंटल600402544354250
तुळजापूर---क्विंटल125441144114411
मानोरा---क्विंटल270300044704140
मोर्शी---क्विंटल190400041804090
सिंदखेड राजाडॅमेजक्विंटल18400044004200
धुळेहायब्रीडक्विंटल3350042504250
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल86200046004550
अमरावतीलोकलक्विंटल618415043474248
नागपूरलोकलक्विंटल47410042114183
मेहकरलोकलक्विंटल260400044104300
लातूरपिवळाक्विंटल2928430045314400
जालनापिवळाक्विंटल294380044004350
अकोलापिवळाक्विंटल335410043704250
यवतमाळपिवळाक्विंटल58410042704185
अकोटपिवळाक्विंटल60395542904200
चिखलीपिवळाक्विंटल43370043004000
उमरेडपिवळाक्विंटल191400044004200
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल100420045254365
मलकापूरपिवळाक्विंटल130398544154280
जामखेडपिवळाक्विंटल5390041004000
शिरपूरपिवळाक्विंटल1400040004000
लोणारपिवळाक्विंटल50410043004225
अहमहपूरपिवळाक्विंटल544330045324267
औराद शहाजानीपिवळाक्विंटल136433043904360
मंगरुळपीरपिवळाक्विंटल880370045304450
नेर परसोपंतपिवळाक्विंटल96150043403535
काटोलपिवळाक्विंटल7425042704260
देवणीपिवळाक्विंटल15440044004400

अधिक वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र 

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रशेतकरीबाजारमराठवाडाविदर्भमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती