lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > ज्वारीची आवक वाढणार; बाजारभावातही होतेय वाढ

ज्वारीची आवक वाढणार; बाजारभावातही होतेय वाढ

Inflow of sorghum will increase; The market price is also increasing | ज्वारीची आवक वाढणार; बाजारभावातही होतेय वाढ

ज्वारीची आवक वाढणार; बाजारभावातही होतेय वाढ

ज्वारीला प्रतीनुसार २००० ते ४६०० प्रति क्विंटल दर मिळत आहे. बार्शी बाजार समिती ही भुसार मालाच्या आवकसाठी प्रसिद्ध आहे. तसेच बार्शी तालुका हा ज्वारी उत्पादनासाठी ओळखला जातो.

ज्वारीला प्रतीनुसार २००० ते ४६०० प्रति क्विंटल दर मिळत आहे. बार्शी बाजार समिती ही भुसार मालाच्या आवकसाठी प्रसिद्ध आहे. तसेच बार्शी तालुका हा ज्वारी उत्पादनासाठी ओळखला जातो.

शेअर :

Join us
Join usNext

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या रब्बी हंगामातील नवीन ज्वारीची आवक सुरू होऊन महिना झाला असला तरी मागील आठ दिवसांपासून आवक वाढली आहे. शनिवारी बाजारात सुमारे २५ हजार कट्टे ज्वारीची आवक आली आहे.

ज्वारीला प्रतीनुसार २००० ते ४६०० प्रति क्विंटल दर मिळत आहे. बार्शी बाजार समिती ही भुसार मालाच्या आवकसाठी प्रसिद्ध आहे. तसेच बार्शी तालुका हा ज्वारी उत्पादनासाठी ओळखला जातो.

बार्शी बाजार समितीत जामखेड भूम, परांडा, वाशी, करमाळा, कर्जत, तुळजापूर आदी तालुक्यातील शेतमाल विक्रीसाठी येतो. आता यंदाच्या हंगामातील नवीन ज्वारीची आवकही मागील महिन्यात सुरू झाली. मात्र, मागील आठ दिवसांपासून आवक वाढली आहे. 

असे आहेत दर
दगडी ज्वारी : २००० ते २८००, मालदंडी : २७०० ते ३२००, ज्यूट ज्वारी : ३००० ते ४६०० याप्रमाणे मालाचा दर्जा पाहून दर मिळत आहे.
मागील महिन्याच्या तुलनेत उच्च प्रतीच्या दरात क्चिटल मागे ३०० रुपये तर कमी प्रतीच्या ज्वारीच्या दरात ८०० रुपये दर कमी झाले असल्याचे ज्वारी खरेदीदार तुकाराम माने यांनी सांगितले.

आवक आणखी वाढणार
बार्शी व परिसरातील नवीन ज्वारी काढणीही सध्या वेगाने सुरू आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात आवकमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे यांनी यावेळी सांगितले.

यंदा दुप्पट माल
सध्या संपूर्ण शेतकरी मालाची आवक सुरू आहे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आवकही दुप्पट आहे. आवक वाढली असली तरी दर गेल्यावर्षीप्रमाणेच असल्याचे मर्चट असोसिएशनचे सचिव महेश करळे यांनी सांगितले.

Web Title: Inflow of sorghum will increase; The market price is also increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.