Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > लालेलाल टरबुजांची आवक वाढली १० रुपयांपासून १०० रुपयापर्यंत टरबूज विक्रीला

लालेलाल टरबुजांची आवक वाढली १० रुपयांपासून १०० रुपयापर्यंत टरबूज विक्रीला

Inflow of Lalelal Watermelons increased Watermelon sale from Rs.10 to Rs.100 in Ambajogai | लालेलाल टरबुजांची आवक वाढली १० रुपयांपासून १०० रुपयापर्यंत टरबूज विक्रीला

लालेलाल टरबुजांची आवक वाढली १० रुपयांपासून १०० रुपयापर्यंत टरबूज विक्रीला

नगाप्रमाणेच खरेदी करण्याची ग्राहकांची तयारी असल्याने छोट्या आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंतचे टरबुजाला विशेष मागणी

नगाप्रमाणेच खरेदी करण्याची ग्राहकांची तयारी असल्याने छोट्या आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंतचे टरबुजाला विशेष मागणी

उन्हाची तीव्रता वाढत असताना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईसह परिसरात मोठ्या प्रमाणात टरबुजांची आवक वाढली आहे. लालेलाल टरबून १० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंतच्या दराने विक्री होत आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी टरबूज विक्रीला आली आहेत.

कडक उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्यानंतर शरीराला थंडपणा मिळतो. उन्हाळ्यात ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान बालकांपर्यंत सर्वांची पहिली पसंती टरबूजला असते. टरबुजाचे दर त्यांच्या आकारावरून ठरवले जातात. काही ठिकाणी किलोच्या दराने टरबूज विकले जात आहेत. परंतु, त्यासाठी गिऱ्हाईक अत्यल्प असल्याचे दिसून येते.

नगाप्रमाणेच खरेदी करण्याची ग्राहकांची तयारी असल्याने छोट्या आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंतचे टरबुजाला विशेष मागणी आहे. ग्रामीण भागातून टरबुज वाहनामध्ये आणून शहरात विकले जात आहेत. छोटे शेतकरी दुचाकी, तीनचाकी वाहनांमधून टरबूज विक्रीसाठी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.

एक लिटर पाणी खरेदी करण्यासाठी २० रुपये अन् दुधाला २५ रुपये भाव ; दूध उत्पादक संकटात

आठवडी बाजारात अधिक मागणी

मंगळवार, शुक्रवार, रविवार या दिवशी भरणाऱ्या आठवडी बाजारातून टरबुजांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने मंडीबाजार, गुरुवार पेठ, शिवाजी महाराज चौक, स्वा. सावरकर चौक, अण्णाभाऊ साठे चौकासह इतरत्र टरबूज विक्री होताना दिसून येत आहे.

Web Title: Inflow of Lalelal Watermelons increased Watermelon sale from Rs.10 to Rs.100 in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.