Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > कोलम, बासमती, आंबेमोहोरची वाढली गोडी; कसा आहे तांदळाचा बाजारभाव

कोलम, बासमती, आंबेमोहोरची वाढली गोडी; कसा आहे तांदळाचा बाजारभाव

Increased sweetness of kolam, basmati, ambemohor; How is the market price of rice? | कोलम, बासमती, आंबेमोहोरची वाढली गोडी; कसा आहे तांदळाचा बाजारभाव

कोलम, बासमती, आंबेमोहोरची वाढली गोडी; कसा आहे तांदळाचा बाजारभाव

यंदा जानेवारी महिन्यात नवीन तांदूळ बाजारात आला असून, विविध प्रकारच्या तांदळाच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झालेली आहे. कर्नाटकचा कोलम तांदूळ खायला अधिक पसंती देत असल्याने कोलम तांदळाला चांगली मागणी असते.

यंदा जानेवारी महिन्यात नवीन तांदूळ बाजारात आला असून, विविध प्रकारच्या तांदळाच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झालेली आहे. कर्नाटकचा कोलम तांदूळ खायला अधिक पसंती देत असल्याने कोलम तांदळाला चांगली मागणी असते.

भात असेल तर जेवणाची गोडी आणखीनच वाढते. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आवडतात. प्रत्येकाची तांदळाची आवड ही वेगवेगळी आहे. नगरकरांना कोलम, बासमती, आंबेमोहोर या तांदळाची गोडी असल्याचे दिसून येते. नगर शहरातील विविध दुकानदारांकडे केलेल्या चौकशीतून ही बाब समोर आली.

दररोजच्या आहारात तांदळाचा वापर होत असतो. त्यात नगरकरांना कोलम तांदूळ आवडतो. तो मस्तपैकी फुलतो आणि शिजल्यावर सुटसुटीत आणि त्याची चव स्वादिष्ट असते. त्यामुळे घरगुती वापरासाठी कोलम तांदळाला अधिक मागणी आहे. बाजारपेठेत मागील वर्षी विविध प्रकारच्या तांदळाचे भाव स्थिर होते.

अधिक वाचा: धिंगरी अळिंबीचे उत्पादन कसे केले जाते?

यंदा मात्र जानेवारी महिन्यात नवीन तांदूळ बाजारात आला असून, विविध प्रकारच्या तांदळाच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झालेली आहे. कर्नाटकचा कोलम तांदूळ खायला अधिक पसंती देत असल्याने कोलम तांदळाला चांगली मागणी असते.

तांदळाच्या दरात वाढ
तांदळाची धान्य बाजारात जानेवारी महिन्यात आवक होत असते. गतवर्षी जानेवारी महिन्यात विविध प्रकारच्या तांदळाच्या दरात सुमारे २ किंवा ४ टक्के वाढ झाली होती. दिवाळीनंतर मात्र तांदळाच्या दरात वाढ झाली आहे. विविध प्रकारच्या तांदळात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तांदूळ आणखी महागणार
तांदळाचा वापर हा गरिबांपासून ते श्रीमंतांच्या घरात होत असतो. त्यामुळे धान्य बाजारात तांदळाला मोठी मागणी असते. परंतु गेल्या वर्षभरात बदलत्या वातावरण त्यात अवकाळी पावसामुळे तांदूळ पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामानाने तांदळाची मागणी उलट वाढ होत आहे; मात्र उत्पादन कमी होत असल्याने तांदूळ आणखी वाढण्याची शक्यता बाजारात व्यक्त केली आहे.

तांदळाचे भाव (प्रतिकिलो)
कोलम - ६८ रुपये
आंबोमोहोर - ८० रुपये
बासमती (लांब) - १३० रुपये
चिनोर - ४८ रुपये

Web Title: Increased sweetness of kolam, basmati, ambemohor; How is the market price of rice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.