Lokmat Agro >बाजारहाट > आयातीने साधला डाव; देशी डाळींचा मात्र कमी झाला भाव

आयातीने साधला डाव; देशी डाळींचा मात्र कमी झाला भाव

Imports have succeeded; however, the prices of domestic pulses have decreased | आयातीने साधला डाव; देशी डाळींचा मात्र कमी झाला भाव

आयातीने साधला डाव; देशी डाळींचा मात्र कमी झाला भाव

देशात डाळीची आयात मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. येथील डाळीपेक्षा किलोमागे १५ रुपयांनी कमी मिळत असल्याने स्थानिक डाळ ग्राहकांच्या घरी शिजत नाही.

देशात डाळीची आयात मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. येथील डाळीपेक्षा किलोमागे १५ रुपयांनी कमी मिळत असल्याने स्थानिक डाळ ग्राहकांच्या घरी शिजत नाही.

शेअर :

Join us
Join usNext

देशात डाळीची आयात मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. येथील डाळीपेक्षा किलोमागे १५ रुपयांनी कमी मिळत असल्याने स्थानिक डाळ ग्राहकांच्या घरी शिजत नाही.

आताच असा दर असेल तर खरीप हंगामात डाळींचे उत्पादन घ्यायचे की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने खाद्यतेलाचे आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केल्याने त्याचेही दर घसरले आहेत.

गेल्या वर्षभरात तूरडाळसह सर्वच डाळींना तेजी होती. चांगल्या प्रतीची तूरडाळ दोनशे रुपये किलोपर्यंत पोहोचली होती. हरभरा डाळीनेही ९० रुपयांपर्यंत मजल मारली होती. मात्र, केंद्र सरकारने डाळींचे आयात शुल्क बंद केल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात परदेशातील डाळी आयात केल्या आहेत.

त्याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसला आहे. खाद्यतेलाचे आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केल्याने त्याचेही दर कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात सरकी तेल १४५ रुपये किलोपर्यंत आहे. सूर्यफुलाचे तेलही कमी झाले आहे.

डाळीचे दर असे....

डाळ जून २०२४ जून २०२५ 
तूरडाळ १७६ १२० 
हरभरा डाळ ९५ ८० 
मसूर डाळ ९० ८५ 
मुगडाळ १२५ १२० 
उडीद डाळ १६० १३५ 

परदेशातील हलकी डाळ कोण खाते ?

परदेशातील येणारी तूरडाळ हलक्या प्रतीची असल्याने त्याचे दर कमी आहेत. ही डाळ कर्नाटक, ओडिसा, छत्तीसगड, आदी राज्यांत विक्री होते.

शेतकऱ्यांना आधारभूत किंमत तरी द्या!

• शेतकऱ्यांनी डाळीचे उत्पादन घेतल्यानंतर त्यांना केंद्र सरकारने निर्धारित केलेली आधारभूत किंमतही मिळत नाही.

• यंदाच्या खरीप हंगामानंतर दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

मागणी आणि पुरवठा यावरच बाजारातील दर अवलंबून आहेत. डाळीची आयात झाल्याने सध्या दर घसरले आहेत. यामुळे आगामी हंगामात शेतकऱ्यांनी उत्पादन कमी केले तर त्याचाही परिणाम होणार आहे. देशातील डाळींचा स्टॉक पाहून आयातबाबत धोरण निश्चित करण्याची गरज आहे. - सदानंद कोरगावकर, कडधान्य व्यापारी, कोल्हापूर.

हेही वाचा :  यंदा जूनमध्येच राज्यातील धरणे ३७ टक्के भरली; वाचा विभागनिहाय किती झालाय जलसाठा

Web Title: Imports have succeeded; however, the prices of domestic pulses have decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.