खरिपातील सोयाबीन बाजारात येत असून अनेक व्यापाऱ्यांकडून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल परवानाधारक व्यापाऱ्यांकडेच विकण्याची गरज आहे. माल विक्रीनंतर बाजार समितीच्या शिक्क्याची गुलाबी पावती (पक्की पावती) घेणे आवश्यक आहे.
पक्की पावती कायदेशीर आधार आणि शासकीय योजनांसाठी गरजेची आहे. नियमानुसार शेतकऱ्याला २४ तासांत पैसे मिळणे बंधनकारक आहे. सात दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास, शेतकऱ्यांनी पक्क्या पावतीसह बाजार समितीत तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. यासोबत शेतकऱ्यांनी आपला शेतमाल केवळ परवानाधारक व्यापाऱ्यांनाच विकावा, असेही आवाहन धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.
तसेच माल विक्री झाल्यानंतर बाजार समितीच्या शिक्क्याची गुलाबी पावती (पक्की पावती) घेणे अत्यावश्यक आहे. कोऱ्या पावत्यांना कोणताही कायदेशीर आधार मिळणार नाही, तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही पक्की पावती गरजेची आहे. बाजार समितीच्या नियमानुसार शेतमाल विक्री केल्यापासून २४ तासांत शेतकऱ्याला पैसे मिळणे बंधनकारक आहे.
जर व्यापाऱ्याने सात दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी रक्कम अडवून ठेवली, तर शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात संपर्क साधून तक्रार करावी. शेतकऱ्यांनी जास्त भावाचे आमिष दाखवून चेक देणे किंवा ६ महिन्यांनी पैसे देण्याच्या व्यापाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.
तसेच वजनकाटा प्रमाणित असल्याची खात्री करूनच वजन घ्यावे. रक्कम मिळण्यास विलंब झाल्यास, पक्की पावतीसह समिती कार्यालयात तक्रार दाखल करावी. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बाजार समितीने दिला आहे.