Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लाल आणि पांढऱ्या तुरीला किती मिळतोय दर; वाचा आजचे तुर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 17:50 IST

Tur Bajar Bhav : राज्यात आज शुक्रवार (दि.३०) जानेवारी रोजी एकूण १८२१३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ४८० क्विंटल गज्जर, ४ क्विंटल काळी, ११७६२ क्विंटल लाल, ६७० क्विंटल लोकल, १००८ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.

राज्यात आज शुक्रवार (दि.३०) जानेवारी रोजी एकूण १८२१३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ४८० क्विंटल गज्जर, ४ क्विंटल काळी, ११७६२ क्विंटल लाल, ६७० क्विंटल लोकल, १००८ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.

तुरीची आज सर्वाधिक आवक विदर्भाच्या कारंजा बाजारात होती. तसेच अकोला आणि अमरावती येथे देखील लाल तुरीची सर्वाधिक आवक बघवयास मिळाली. दरम्यान कारंजा येथे कमीत कमी ८६१० तर जास्तीत जास्त ९०६० रुपयांचा दर मिळाला. 

लाल तुरीला सर्वाधिक आवकेच्या अमरावती बाजारात कमीत कमी ८००० तर सरासरी ८५७५ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच अकोला येथे ८५९५, सोलापूर येथे ८४२०, लातूर-मुरुड येथे ८२००, नागपूर येथे ८७८४, मेहकर येथे ८४०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

पांढऱ्या तुरीला आज शेवगाव येथे कमीत कमी ८२०० तर सरासरी ८४०० रुपयांचा दर मिळाला. तसेच जामखेड येथे ८२५०, तुळजापूर येथे ८७००, देवळा येथे ७६००, परांडा येथे ८२०० औराद-शहाजानी येथे ८७८६, देउळगाव राजा येथे ८००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

याशिवाय गज्जर वाणाच्या तुरीला हिंगोली येथे कमीत कमी ८३०० तर सरासरी ८६७५, गंगापूर येथे काळ्या तुरीला कमीत कमी ८०७५ तर जास्तीत जास्त ८७००, लोकल वाणाच्या तुरीला काटोल येथे कमीत कमी ८००० तर सरासरी ८५०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/01/2026
जळगाव---क्विंटल2750075007500
चंद्रपूर---क्विंटल38840088958640
राहूरी -वांबोरी---क्विंटल13808083008203
पैठण---क्विंटल79815183908200
भोकर---क्विंटल25830086008450
कारंजा---क्विंटल4100861090608610
वरूड-राजूरा बझार---क्विंटल32765091408723
हिंगोलीगज्जरक्विंटल480830090508675
गंगापूरकाळीक्विंटल4807587008075
सोलापूरलालक्विंटल75800088008420
लातूर -मुरुडलालक्विंटल26800083018200
अकोलालालक्विंटल2470700590008595
अमरावतीलालक्विंटल3720800091508575
जळगावलालक्विंटल28829582958295
जळगाव - मसावतलालक्विंटल53830088008400
नागपूरलालक्विंटल2206800090468784
सावनेरलालक्विंटल510700086758400
मेहकरलालक्विंटल700801086008400
नांदगावलालक्विंटल191800086008350
मंगळवेढालालक्विंटल15610073507110
औराद शहाजानीलालक्विंटल204860092008900
तुळजापूरलालक्विंटल70800086508500
सेनगावलालक्विंटल63800085008200
बुलढाणालालक्विंटल300800085008250
बाभुळगावलालक्विंटल350800187258401
राजूरालालक्विंटल12800083658270
आष्टी- कारंजालालक्विंटल260810087408350
सिंदी(सेलू)लालक्विंटल350800087008550
जळकोटलालक्विंटल159805584008275
काटोललोकलक्विंटल670800087008500
जामखेडपांढराक्विंटल76650085008250
शेवगावपांढराक्विंटल259820084008400
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल56820084008200
देउळगाव राजापांढराक्विंटल50700084008000
कुर्डवाडी-मोडनिंबपांढराक्विंटल167800092268800
गंगापूरपांढराक्विंटल78660080508050
औराद शहाजानीपांढराक्विंटल237850190718786
परांडापांढराक्विंटल6815083008200
तुळजापूरपांढराक्विंटल75800088018700
देवळापांढराक्विंटल4620079657600

हेही वाचा :  मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Tur Rates in Maharashtra: Today's Market Prices and Analysis

Web Summary : Maharashtra saw 18213 quintals of tur arrival. Red tur fetched ₹8784 in Nagpur, while white tur reached ₹8786 in Aurad Shahajani. Karंजा recorded the highest arrival. Prices vary across markets as per the official data.
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारतूरमार्केट यार्डविदर्भमराठवाडाशेतकरी