Join us

मधाचे दर गगनाला; मधमाशांची संख्या घटल्याने फलधारणा प्रक्रियेवरही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:06 IST

पूर्वी सहजपणे कुठेही दिसणारे मधमाशांचे मोहोळ आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. याचा थेट परिणाम मधाच्या उत्पादनावर होत असून, सध्या मधाचा दर ४०० ते ५०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.

शेषराव वायाळ 

पूर्वी सहजपणे कुठेही दिसणारे मधमाशांचे मोहोळ आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. याचा थेट परिणाम मधाच्या उत्पादनावर होत असून, सध्या मधाचा दर ४०० ते ५०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.

वाढते प्रदूषण, रासायनिक खतांचा वापर आणि पिकांवरील औषध फवारणीमुळे मधमाशांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यामुळे मोहोळांची संख्या कमी झाली असून, शेती आणि फलोत्पादन क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.

मधमाशांचे महत्त्व केवळ मध किंवा मेण मिळवण्यासाठी नसून, त्यांचा उपयोग मोसंबी, डाळिंब, टरबूज, खरबूज आदी फळपिकांच्या फलधारणा प्रक्रियेतदेखील महत्त्वाचा आहे.

विविध उपाययोजना राबविणे ही काळाची गरज

सध्याच्या काळात मथ उत्पादनात होणारी घट ही गंभीर बाब असून, पर्यावरणपूरक शेती, जैविक पद्धतीचा अवलंब तसेच मधमाशांचे संवर्धन करणाऱ्या उपाययोजना राबविणे ही काळाची गरज आहे. अन्यथा फळपिकांचे उत्पादन आणि आरोग्यदायी मध दोन्ही दुर्मिळ ठरतील, असे शेतकरी सांगत आहेत.

फळधारणा मंदावली

• परागसिंचन (पोलनायझेशन) प्रक्रियेत मधमाशांचा सहभाग असल्याने त्यांच्या संख्येतील घट फळबागांमध्ये फळधारणा मंदावण्याचे कारण ठरत आहे.

• मागील दोन वर्षांपासून टरबूज व इतर उत्पादक याच समस्येने त्रस्त उत्पादनात घट फळपिकांचे असून, जाणवू लागली आहे. यामुळे मध विक्रीचा व्यवसायही अडचणीत आला आहे.

एकेकाळी भरपूर प्रमाणात मिळणारा मध आता दुर्मिळ होत चालल्याने बाजारात त्याचे दर प्रचंड वाढले आहेत. मधाची औषधी दृष्टीनेही विशेष मागणी असते. मधात इतर औषधांचे गुणधर्म आहे तो शरीरात खोलवर पोहोचवण्यास मदत करतो. मध हा सात्विक आहाराचा भाग मानला जात असून, त्याला आयुर्वेदात मोठे स्थान आहे. - डॉ. दीपक दिरंगे, आयुर्वेदाचार्य जालना.

हेही वाचा : गवतात आढळणारा 'हा' किडा चावल्याने होतो स्क्रब टायफस आजार; वेळीच लक्ष न दिल्यास ठरू शकतो प्राणघातक 

टॅग्स :बाजारशेती क्षेत्रअन्नमार्केट यार्डशेतकरीफळेपीक व्यवस्थापन