lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > कोकणचा हापूस अमेरिका दौऱ्यावर, पहिल्या टप्प्यात २८ टन आंबा निर्यात

कोकणचा हापूस अमेरिका दौऱ्यावर, पहिल्या टप्प्यात २८ टन आंबा निर्यात

Hapus of Konkan on tour to America, export 28 tons of mangoes in the first phase | कोकणचा हापूस अमेरिका दौऱ्यावर, पहिल्या टप्प्यात २८ टन आंबा निर्यात

कोकणचा हापूस अमेरिका दौऱ्यावर, पहिल्या टप्प्यात २८ टन आंबा निर्यात

यावर्षीच्या आंबा हंगामातील निर्यातीचा पहिला टप्पा पार पडला असून, लासलगाव येथील विकिरण प्रक्रिया केंद्रातून पहिल्या टप्प्यात ७ हजार ५०० पेट्यांमधून २८ मेट्रिक टन हापूस आंबा अमेरिकेला निर्यात करण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यावर्षीच्या आंबा हंगामातील निर्यातीचा पहिला टप्पा पार पडला असून, लासलगाव येथील विकिरण प्रक्रिया केंद्रातून पहिल्या टप्प्यात ७ हजार ५०० पेट्यांमधून २८ मेट्रिक टन हापूस आंबा अमेरिकेला निर्यात करण्यात आला आहे.

यामध्ये ३० टक्के हापूस रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील आहे. मात्र, गतवर्षापेक्षा ही निर्यात तुलनेने कमी असल्याचे पणन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. लासलगाव येथील कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून कृषक केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

गेल्या १६ वर्षांपासून या केंद्रावर आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून निर्यात केली जात आहे. विशिष्ट गोडी, चव, आकार यामुळे भारतीय विविध वाणांच्या आंब्यांना परदेशात वाढती मागणी आहे, त्यानुसार अमेरिकेच्या निर्यात मानकांप्रमाणे आंब्यावर विकिरण प्रक्रिया केली आते.

कृषक केंद्राची क्षमता अधिक असल्याने मुख्यत्वे लासलगाव केंद्र विकिरण प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. या केंद्रात गामा किरणांचा ४०० ते ७०० ग्रॅम मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढविण्यासह आंबा पिकण्याची प्रक्रिया लांबविली जाते.

शिवाय कोयीमधील कीड नष्ट होण्यास मदत होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रियाही थांबते, कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

केंद्रातून हापूस, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. आंब्याची अमेरिका वारी सुरु झाल्याने बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. ही निर्यात अजून वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे

गतवर्षी एक हजार टन निर्यात
-
या केंद्रातून गेल्या वर्षी अमेरिकेत १ हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली होती.
गेल्या २६ वर्षांतील ती सर्वाधिक निर्यात होती, सन २०१९ मध्ये ६८० मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला होता.
मात्र, कोरोनाकाळात ही निर्यात बंद होती. त्यामुळे सन २०२० आणि सन २०२१ मध्ये आंबा निर्यात झाला नाही.
सन २०२२ मध्ये पुन्हा आंब्याची निर्यात सुरु झाली, त्यावेळी ३०० मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला.

अधिक वाचा: हापूसच्या फळांचे संरक्षण, आकार व वजन वाढविण्यासाठी करा हा एकदम सोपा स्वस्त उपाय

Web Title: Hapus of Konkan on tour to America, export 28 tons of mangoes in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.