Lokmat Agro >बाजारहाट > Halad Bajarbhav: वसमतच्या मोंढ्यात पिवळ्या सोन्याच्या आवकेत वाढ; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Halad Bajarbhav: वसमतच्या मोंढ्यात पिवळ्या सोन्याच्या आवकेत वाढ; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Halad Bajarbhav: Increase in halad arrivals in Vasmat's Mondha; Read in detail how the price was obtained | Halad Bajarbhav: वसमतच्या मोंढ्यात पिवळ्या सोन्याच्या आवकेत वाढ; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Halad Bajarbhav: वसमतच्या मोंढ्यात पिवळ्या सोन्याच्या आवकेत वाढ; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Halad Bajarbhav : वसमत येथील मोंढ्यात नवीन हळद येण्यास सुरुवात झाली असून सोमवारी २ हजार हळदीच्या कट्ट्यांची आवक (halad arrivals) झाली होती. त्याला कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Halad Bajarbhav : वसमत येथील मोंढ्यात नवीन हळद येण्यास सुरुवात झाली असून सोमवारी २ हजार हळदीच्या कट्ट्यांची आवक (halad arrivals) झाली होती. त्याला कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Halad Bajarbhav : वसमत येथील मोंढ्यात नवीन हळद येण्यास सुरुवात झाली असून सोमवारी २ हजार हळदीच्या कट्ट्यांची आवक (halad arrivals) झाली होती. यावेळी झालेल्या बिटात दर्जेदार हळदीस १२ हजार ३०५ रुपयांचा भाव मिळाला.

कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढ्यात १० मार्च रोजी नवीन हळदीच्या जवळपास दोन हजार कट्टयांची आवक झाली. यावेळी हळदीचे बीट पुकारण्यात येऊन हळदीस ९ हजारांपासून ते १२ हजारापर्यंत भाव मिळाला. परंतु दर्जेदार हळदीस १२ हजार ३०५ रुपयांचा भाव मिळाला. (halad arrivals)

नवीन हळद घेऊन आलेल्या विक्रम पांडोजी जाधव या शेतकऱ्याचा व्यापाऱ्यांनी दस्ती, टोपी देत सत्कार केला. यावेळी व्यापारी पुष्पेंद्र जैन, कैलास काबरा, रियाज हवालदार, संजय भोसले, दौलत हुंबाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

भाव वाढीची आशा

* वर्षभरापासून हळदीच्या भावात चढ-उतार होत आहे.

* भविष्यात हळदीच्या दरात तेजी येईल, या हेतूने जुनी हळद व्यापाऱ्यांनी गोदामात तर शेतकऱ्यांनी आखाड्यावर साठवून ठेवली आहे.

* सद्यस्थितीत गतवर्षीपेक्षा हळदीस कमी भाव मिळत आहे. भविष्यात हळदीचे भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

हळदीच्या भावात तेजी येईल

मार्चमध्ये हळद काढणीस सुरुवात झाली असून मोंढ्यात नवीन हळद येणे सुरू झाले आहे. सध्या हळदीचे भाव १२ हजारांपर्यंत जात आहेत. भविष्यात हळदीचे दर वाढतील, अशी आशा आहे. - पुष्पेंद्र जैन, व्यापारी

शेतमाल : हळद/ हळकुंड

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/03/2025
नांदेड---क्विंटल62083451234511450
भोकर---क्विंटल138300103009300
हिंगोली---क्विंटल104090001100010000

हे ही वाचा सविस्तर : Halad BajarBhav : नवीन हळद बाजारात दाखल; मुहूर्ताला काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Web Title: Halad Bajarbhav: Increase in halad arrivals in Vasmat's Mondha; Read in detail how the price was obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.