Join us

मंचर बाजार समितीत वाटाण्याला मिळाला सर्वाधिक भाव; प्रति किलो कसा मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 15:37 IST

green vatana bajar bhav मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तरकारी शेतमालाची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे.

green vatana bajar bhav मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तरकारी शेतमालाची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे.

रविवारी बाजार समितीत एकूण १२,२४६ डाग इतकी आवक झाली असून, वाटाण्याला १४० रुपये प्रति किलो आणि गवारीला १२० रुपये प्रति किलो असा चढा भाव मिळाला आहे.

बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी सांगितले की, आवक घटल्याने शेतमालाच्या किमतीत वाढ झाली आहे. वाटाण्याला १० किलोला ५२० ते १,४०० रुपये, तर गवारीला ६५० ते १,२०० रुपये भाव मिळाला.

शेतमाल (कंसात आवक डागमध्ये)कारले (३०१): १८५-३५० रुपयेघेवडा (१३४): २४५-४७० रुपयेचवळी (२४७): २५०-४७० रुपयेढोबळी मिरची (१०३): २८५-५५१ रुपयेभेंडी (२९५): २७०-५२० रुपयेफ्लॉवर (४,१३०): ११५-२२० रुपयेकोबी (१,२६४): ६०-१०० रुपयेटोमॅटो (१३७): २१५-४०० रुपयेपापडी (३३८): ४५०-६८० रुपयेवालवड (११५): ४००-६०० रुपये

उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले की, कमी आवक आणि मागणीमुळे शेतमालाला चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचा: Tukadebandi : तुकडेबंदीतील दस्त नियमित करण्या संदर्भात महसूलमंत्र्यांनी दिली 'ही' महत्वाची बातमी

टॅग्स :भाज्याबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमंचरमिरची