Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Bajar Bhav : नवीन गहू बाजारात आला, यंदा भाव तेजीत; कोणत्या गव्हाला काय मिळतोय दर?

Gahu Bajar Bhav : नवीन गहू बाजारात आला, यंदा भाव तेजीत; कोणत्या गव्हाला काय मिळतोय दर?

Gahu Bajar Bhav : New wheat has come into the market, prices have increased this year; What price is being paid for which wheat? | Gahu Bajar Bhav : नवीन गहू बाजारात आला, यंदा भाव तेजीत; कोणत्या गव्हाला काय मिळतोय दर?

Gahu Bajar Bhav : नवीन गहू बाजारात आला, यंदा भाव तेजीत; कोणत्या गव्हाला काय मिळतोय दर?

gahu bajar bhav उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये नवीन गहू आणि ज्वारीची आवक सुरू झाली आहे.

gahu bajar bhav उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये नवीन गहू आणि ज्वारीची आवक सुरू झाली आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये नवीन गहू आणि ज्वारीची आवक सुरू झाली आहे.

अत्याधुनिक यंत्रसामग्री, सुधारित वाण आणि खतांचा योग्य वापर यामुळे यंदा गव्हाचे प्रतिहेक्टर उत्पादन वाढले आहे.

तरीही केंद्र सरकारने निर्यातीला दिलेली परवानगी आणि ज्वारीच्या उत्पादनातील घट यामुळे बाजारातील समीकरणे बदलली आहेत.

गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. रब्बी हंगामात गव्हाचा पेरा वाढल्याने बाजारात गव्हाची आवक आता गतीने सुरू आहे.

मात्र, दुसरीकडे ज्वारीचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टरने घटल्याने यंदा ज्वारीचे दर वधारले आहेत. केंद्र सरकारने नुकतीच २५ लाख टन गहू निर्यातीला मंजुरी दिली आहे.

अडत बाजारात स्थिती
◼️ सध्या घाऊक बाजारात गव्हाचा सरासरी दर २,६०० ते २,८०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे.
◼️ ज्या गव्हाची प्रतवारी चांगली आहे तसेच गहू मशीनक्लीन आहे, अशा गव्हाला ३,३०० रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळत आहे.

गव्हाचे प्रकार आणि दर
लोकवन : २,६०० ते २,६५० रुपये.
चंदोसी : ३,००० ते ३,१०० रुपये.
१४७ गहू : २,७०० ते ३,००० रुपये.
२१९८ गहू : २,७०० ते २,८०० रुपये.

यंदा गव्हाचा दाणा टपोरा आणि दर्जेदार आहे. निर्यातीला परवानगी मिळाल्याने जागतिक बाजारपेठेतील दरांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. - राजू मर्दाने, व्यापारी

बाजारात नवीन गहू दाखल होण्यास सुरवात झाली आहे. यावर्षी आवक वाढली तरी भाव टिकून राहतील. शेतकऱ्यांनाही भाव चांगला मिळणार आहे. - दिगंबर भोसले, व्यापारी

अधिक वाचा: तीन फुटांच्या सरीवर ठिबकचा वापर करून हरभऱ्याची लागवड; एकरात १८ ते २० क्विंटल उत्पादन

Web Title : गेहूं बाजार भाव: बाजार में नया गेहूं, इस साल कीमतें बढ़ीं

Web Summary : उत्पादन बढ़ने से बाजारों में नए गेहूं की आवक जोरदार है। ज्वार के रकबे में गिरावट के बावजूद, सरकारी मंजूरी से गेहूं निर्यात को बढ़ावा मिला है, जिससे किसानों को अच्छी कीमतें मिल रही हैं। उच्च गुणवत्ता वाले गेहूं की प्रीमियम दरें हैं, जो वैश्विक मांग से लाभान्वित हैं।

Web Title : Wheat Market Rate: New Wheat Arrives, Prices Surge This Year

Web Summary : New wheat arrivals in markets are robust due to increased production. Despite a drop in sorghum acreage, wheat exports are boosted by government approval, leading to good prices for farmers. High-quality wheat fetches premium rates, benefiting from global demand.