Join us

Fruits Market : मालेगाव बाजार समिती आवारात फळांची मोठी आवक; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:43 IST

Fruits Marker Rate Update : मालेगाव शहरातील बाजार समितीत या आठवड्यात १२ टन खरबूज, १० टन खरबूज आणि द्राक्षांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. केरळचा लालबाग आंबा आणि बदाम आंबाही बाजारात उपलब्ध झाला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरातील बाजार समितीत या आठवड्यात १२ टन खरबूज, १० टन खरबूज आणि द्राक्षांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. केरळचा लालबाग आंबा आणि बदाम आंबाही बाजारात उपलब्ध झाला आहे.

उन्हामुळे टन खरबूज टरबुजाची समितीत काही फळांना बाजारपेठेत मागणी वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. येत्या काही दिवसांत जसजसे उन्हाचा तडाखा वाढेल तसतशी या फळांची मागणी वाढण्यास मदत होणार आहे.

महाशिवरात्रीला दर वर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात फळांना मागणी असल्याने, मार्केटला या आठवड्यात मोठी गर्दी आहे. खरबूज आणि व १० टन बाजार आवक टरबूज जास्त विकले जात आहेत.

विक्रेते आणि ग्राहक दोघांना भाव परवडत आहेत. असे फळ विक्रेते सचिन माळी यांनी सांगितले.

फळांचे दर (प्रति किलो)

आंबा२००-२५०
द्राक्ष१००-१२०
खरबूज४०-५०
ड्रॅगन फ्रूट१७०-२००
संत्री७०-८०
सफरचंद१५०-१६०
टरबूज१५-२०
चिकू२५-३०
खजूर३५-५०
केळी२०-३०

हेही वाचा : कांदा उत्पादकांच्या एकजुटीला यश; माणिकपुंज परिसरातील शेतकऱ्यांनी धरली प्रगत शेतीतून परराज्यातील बाजारांची वाट

टॅग्स :फळेबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डनाशिकशेतकरीशेतीशेती क्षेत्र