यंदा उन्हाळा आणि मुस्लीम धर्मीयांचा पवित्र रमाजान महिना २ मार्चपासून सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील बाजारपेठेत (Fruit Market) फळांचा बाजार बहरला आहे.
उपवासासाठी मोठ्या संख्येने टरबूज, खरबूज, अननस, काकडी, द्राक्ष, आंबा यासह पपई, चिकू, केळी, सफरचंद आदी फळांची खरेदी केली जात आहे. (Fruit Market)
फळांची मागणी लक्षात घेऊन किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. यात सफरचंद २०० ते २५० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १५ टक्क्यांनी फळाचे भाव वाढले आहे. दरम्यान, फळांची मोठ्या प्रमाणात विक्री होऊन कोटींची उलाढाल होत आहे. (Fruit Market)
यंदा उन्हाळा व रमजान महिन्यामुळे बाजारात फळांची आवक वाढली आहे. यात टरबूज व खरबूज मोठ्या प्रमाणात दाखल झाले. जालना शहरातील सिंधी बाजारासह ठिकठिकाणी फळांची विक्री होत आहे. (Fruit Market)
आवक कमी अन् मागणी वाढल्याने जास्त
१. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागतात फळांच्या भावात काही प्रमाणात वाढ होते. मात्र, यंदा पवित्र रमजान महिना आणि उन्हाळासोबत आल्याने इतर वर्षीच्या तुलनेत ही भाववाढ अधिक असल्याचे दिसून येत आहे.
२. सध्या बाजारात फळाची आवक कमी आहे. त्यामुळे हे भाव तेजीत असल्याचे दिसून येत आहे.
३. १०० टन टरबूज, ५० टन खरबूज विक्री होत असून, आंध्र प्रदेश आणि केरळमधून बदाम आंबा देखील विक्रीसाठी दाखल झाला आहे.
४. वाढत्या उन्हाचा कडाका आणि पवित्र रमजानमुळे रसदार फळांना अधिक मागणी होत आहे. यात टरबूज, खरबूज, द्राक्षे खरेदीवर अधिक भर आहे.
सध्या आवक कमी असल्याने भाव तेजीत आहेत. मात्र, या फळांची आगामी १५ दिवसांनी आवक वाढल्यास काही प्रमाणात भाव कमी होतील. - गोरखनाथ हिवाळे, फळ विक्रेते.
यंदा बाजारातील फळाचे भाव
पपई | ४० रुपये |
केळी | ६० रुपये |
अंजीर | १०० रुपये |
सफरचंद | २०० रुपये |
चिकू | १०० रुपये |
रामफळ | १०० रुपये |
टरबूज | २० रुपये |
खरबूज | ४० रुपये |
द्राक्ष | १०० रुपये |
काळे द्राक्षे | १६० रुपये |
आंबा | २०० रुपये |
अननस | ८० रुपये |
(सदर भाव हे प्रति किलो प्रमाणे आहेत.)