Join us

Flower Bajar Bhav : मंचर बाजार समितीत फ्लॉवरची विक्रमी आवक; कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:21 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे फ्लॉवर या तरकारी शेतमालाची विक्रमी आवक झाली आहे. तसेच इतर तरकारीचीही मोठी आवक झाली. जाणून घेऊया कसे मिळाले दर?

मंचर : कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे फ्लॉवर या तरकारी शेतमालाची विक्रमी आवक झाली असून, बाजारभावात घसरण झाल्याची माहिती सभापती नीलेश स्वामी थोरात यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे तरकारी शेतमालाची एकूण ८ हजार ६२६ डाग इतकी आवक झाली. फ्लॉवर या शेतमालाला दहा किलोला १८० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.

बाजार समितीमध्ये आंबेगाव, खेड, पारनेर, जुन्नर, शिरूर या भागातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी तरकारी हा शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत असतात.

तरकारी शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाचे वजन, बाजारभाव व एकूण रक्कम यांची माहिती एसएमएस मोबाईल अॅपद्वारे यांच्या मोबाईलवर लगेच कळते. ही विश्वासार्हता असल्यामुळे पाच तालुक्यांतील शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेऊन येतात.

तरकारी मालाचे १० किलोप्रमाणे बाजारभावकारले १८०-५२०, गवार ६००-९५०, घेवडा ९०५, चवळी ५००-९००, ढोबळी मिरची ३००-७००, फ्लॉवर १००-१८०, भुईमूग शेंगा २००-४८०, भेंडी ३००-५५१, फारशी ४००-९००, दोडका ४००-७००, मिरची ३००-५००, तोंडली २५०-४००, शेवगा ३००-७००, कोबी ७०-१२०, वांगी १००-५००, बीट १३५-२५०, बटाटा १२०-१५०, आले ३००, गाजर ८०-१५०, टोमॅटो २००-३७०, मका ८०-१५०, कैरी २२०-४००.

अधिक वाचा: महसूल खात्यात निर्णयांचा धडाका, घेतले हे १८ महत्वपूर्ण निर्णय; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :भाज्याबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमंचर