बोर्डी : गावरान जांभळे बाजारात दाखल झाली असून ४०० रुपये प्रतिकिलो भावाने त्यांची विक्री सुरू आहे. जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या रांगांमधून तसेच काही शेतकऱ्यांच्या बांधावरील झाडांची ही जांभळे आहेत.
स्थानिकांच्या मालकीच्या प्रतिझाडास १२ ते १५ हजार रुपये व्यापाऱ्यांकडून दिले जात आहेत. मात्र, खवय्यांच्या पसंतीच्या बहाडोली जांभळे बाजारात येण्यासाठी मे मध्याचा मूहूर्त साधला जाणार आहे.
बहाडोली ही जांभळाची जात टपोरी फळे आणि आतील गरासाठी प्रसिद्ध असून पालघरच्या बहाडोली गावासह डहाणू, तलासरी, विक्रमगड, वसई तसेच जिल्ह्यातील अन्य भागात व्यापारी तत्त्वावर लागवड झाली आहे.
तत्पूर्वी गावरान जांभळे बाजारात दाखल झाली असून ४०० रुपये प्रतिकिलो भावाने त्यांची विक्री सुरू आहे. ग्राहकांकडूनही त्यांना चांगली मागणी आहे.
त्यामुळे खवय्ये याच जांभळांवर समाधान मानत असल्याचे दिसून येत आहे. बहाडोलीची विक्री पश्चिम रेल्वेवर डहाणू ते विरार दरम्यान केली जात होती, त्यावेळी चांगले उत्पन्न मिळायचे.
आता रेल्वे पोलिसांकडून पकडल्यावर मोठा आर्थिक दंड ठोठावला जात असल्याने विक्री बंद केल्याची माहिती रजनी धोडी या विक्रेत्याने दिली. त्यामुळे त्यांच्या विक्रीवर परिणाम होत आहे.
बहाडोली जांभळे मे महिन्याच्या मध्यानंतर येणार
बहाडोली जांभळे सुरू होताच या फळांची मागणी घटेल, अशी माहिती डहाणूतील विक्रेते रवींद्र धोडी यांनी दिली.
ही जांभळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पक्व होतात. यंदा मात्र मे मध्यानंतर फळे बाजारात येतील, अशी माहिती उत्पादकांनी दिली.
फुलोऱ्यावर आणि फळधारणेवर परिणाम
◼️ एप्रिल अखेरपासून बाजारात गावरान जांभळे दाखल झाली तरी बहाडोली जांभळे मे मध्यानंतर बाजारात येतील.
◼️ यंदाच्या हंगामात हवामानातील अनियमिता, अवेळी पाऊस आणि तापमानातील चढ-उतारामुळे बहाडोली जांभळाच्या फुलोऱ्यावर आणि फळधारणेवर विपरीत परिणाम झाला.
◼️ परिणामी झाडांवरील फळांची संख्या कमी असून अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याचे उत्पादकांनी सांगितले.
◼️ या फळांच्या विक्रीतून मोठी उलाढाल होऊन स्थानिकांना रोजगार मिळतो. यंदा उत्पादन घटल्याने त्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होणार आहे.
◼️ पहिल्या टप्प्यात फळांना चांगला दर मिळतो. बाजारात फळांची आवक वाढल्यावर दर कमी होऊन मोसमी पावसाच्या आगमनावेळी कमी भाव मिळतो.
अधिक वाचा: द्राक्ष शेतीतून नगर जिल्ह्यातील 'हे' गाव झालं करोडपती; जमिनीचा दर चाललाय एकरी ५० ते ६० लाख रुपये
Web Summary : Wild Java plums are selling for ₹400/kg before Bahadoli plums arrive mid-May. Unseasonal weather impacted the Bahadoli crop, reducing yields. Locals benefit from plum sales, but face potential income loss due to lower production this year.
Web Summary : बहाडोली जामुन के आने से पहले ही जंगली जामुन 400 रुपये प्रति किलो बिक रहे हैं। बेमौसम मौसम ने बहाडोली की फसल को प्रभावित किया, जिससे उपज कम हो गई। स्थानीय लोगों को जामुन की बिक्री से लाभ होता है, लेकिन इस साल कम उत्पादन के कारण आय में संभावित नुकसान का सामना करना पड़ रहा है।