Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर बाजार समितीत आठ दिवसांपूर्वी कांद्याला ३७०० रुपये भाव; वाचा आता काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:30 IST

kanda market update श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल ३७०० रुपयाचा दर मिळाला होता.

सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल ३७०० रुपयाचा दर मिळाला होता.

आठवड्यातच दरात मोठी घसरण झाली असून, सुमारे एक हजार रुपये कमी मिळत आहे.

दर वाढल्याने जवळपास ५०० ट्रक कांद्याची आवक होत आहे. आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे.

गुरुवारी कमाल दर २८०० रुपये इतका राहिला. सरासरी दर १७०० वरून १००० रुपयांवर आलेला आहे.

जानेवारी महिन्यात आणखी आवक वाढणार आहे. त्यामुळे दर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

अधिक वाचा: दामाजी कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर; पहिला हप्ता किती देणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Onion Prices Plummet After High Arrival Volume: Report

Web Summary : Onion prices in Solapur market crashed from ₹3700 to ₹2800 per quintal within a week due to increased supply. Approximately 500 trucks of onions are arriving daily. Further price drops are expected in January.
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूरशेतीशेतकरी