Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > दुबार व्यापार विक्री बंद! शेतकऱ्यांना तब्बल पन्नास टक्के जास्तीचा भाव

दुबार व्यापार विक्री बंद! शेतकऱ्यांना तब्बल पन्नास टक्के जास्तीचा भाव

DOUBLE TRADE OFF SALE! Almost fifty percent higher price for farmers | दुबार व्यापार विक्री बंद! शेतकऱ्यांना तब्बल पन्नास टक्के जास्तीचा भाव

दुबार व्यापार विक्री बंद! शेतकऱ्यांना तब्बल पन्नास टक्के जास्तीचा भाव

मालाला भाव मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

मालाला भाव मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

पुण्यातील मांजरी उप बाजार समिती येथील संचालक मंडळांनी खोती आणि दुबार व्यापारी विक्री बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री केली जात आहे. 

हवेली परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिकवलेला भाजीपाला मांजरी उप बाजार समिती येथे विक्रीसाठी आणत असतात. तर तेथील खोती (शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन थेट माल विकत घेणारे) आणि व्यापाऱ्यांकडून या शेतकऱ्यांचा माल कमी भावात विकत घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विक्री होत असतो. दरम्यान, या बाजार समितीतील संचालक मंडळाने खोती आणि दुबार व्यापारी विक्री बंद केल्यामुळे आता शेतकऱ्यांना फायदा होत आहे. 

संचालक मंडळाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तब्बल पन्नास टक्के जास्तीचा भाव भाजीपाल्याला मिळत आहे. तर  या निर्णयानंतर खोती आणि व्यापारी बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर भाजीपाल्याची विक्री करत आहेत. 

विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी माल आणल्यानंतर या उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना कुठलीही आडत, तोलाई किंवा कमिशन आकारले जात नाही. त्यामुळे ग्राहकांकडून मालाला मिळणारा भाव थेट शेतकऱ्यांना मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्या संचालक मंडळातील सुदर्शन चौधरी यांनी सांगितली.

मांजरी उपबाजार समितीमध्ये कालचे भाजीपाल्याचे भाव 
भाज्यांची नावे - दर (रुपयांमध्ये)
आंबट चुका - ६/ नग
कारली - ३५/किलो 
दुधी भोपळा - २०/किलो
वांगी - ७/किलो 
कोबी - ७/किलो
ढोबळी मिरची -५०/किलो 
गाजर -२५/किलो 
चवळी -५०/किलो 
कोथिंबीर -१५ /नग, जुडी
काकडी -२०/किलो
घेवडा -५०/किलो 
घोसाळी -३०/किलो 
हिरवी मिरची - ४०/किलो 
भेंडी -५५/किलो
मेथी -२५/नग, जुडी
पालक - १८/नग, जुडी
पावटा - ६०/किलो
टोमॅटो - ९/किलो

Web Title: DOUBLE TRADE OFF SALE! Almost fifty percent higher price for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.