Join us

मागणी वाढली मात्र बाजारातील आवक कमीच; करडई हरभरा दर वधारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:35 IST

Agriculture Market Rate Update : मागील वर्षीच्या रब्बी हंगामात करडीचा पेरा कमी झाला होता. त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी झाले; परंतु करडीच्या तेलाला मागणी वाढल्याने व बाजारात करडीची आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे.

मागील वर्षीच्या रब्बी हंगामात करडीचा पेरा कमी झाला होता. त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी झाले; परंतु करडीच्या तेलाला मागणी वाढल्याने व बाजारात करडीची आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे.

यासोबतच हरभऱ्याच्या दरात सुद्धा मागील काही दिवसांपासून तेजी आल्याने डाळीचे दर वधारले आहेत. सध्या करडीतेल ४०० तर चनादाळ ९० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.

करडी आणि करडी तेलाच्या दराने ऐतिहासिक उच्चांकी दर गाठला आहे. त्यामुळे ज्या मोजक्या शेतकऱ्यांनी करडी विक्री विना साठवून ठेवली होती त्यांना या दरवाढीचा फायदा होत आहे. परंतु असे शेतकरी कमी आहेत.

रब्बी हंगामातील उत्पादित होणाऱ्या इतर शेतमालाला मिळणारा बाजारातील भाव यामुळे करडीचे उत्पादन घेणे कमी झाले. वास्तविकरीत्या करडी पिकाचा उत्पादन खर्च कमी आहे. आता केवळ स्वतःला लागणाऱ्या गरजेएवढी करडीचे पीक शेतात घेतो. - ज्ञानेश्वर नारागुडे, शेतकरी, किनी यल्लादेवी.

बाजारात करडई ८,६०० तर हरभरा ६,५०० रुपये...

• रविवारी लातूर जिल्ह्याच्या उदगीर बाजारात करडीला ८ हजार ६०० प्रतिक्विंटल तर हरभरा ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाल्याचे दिसून आले.

• बाजारात करडीची आवक अत्यल्प असून हरभऱ्याची आवक बऱ्यापैकी आहे; परंतु या दोन्ही पिकाची वाटचाल भविष्यात तेजीची दिसत आहे असे व्यापारी सांगत आहेत.

• हरभऱ्याच्या दरामध्ये मागील काही आठवड्यापासून वाढ होत चालल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भाववाढीमुळे शेतकरी हरभरा बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी करडीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती कमी आले आहे. खाद्यतेलामध्ये सर्वांत जास्त करडीच्या तेलाला ग्राहक पसंती देत आहेत. करडी तेलाच्या दरात वाढ झाली असली तरी आरोग्यासाठी उत्तम असल्याकारणाने ग्राहक करडी तेलाची मागणी करत आहेत. परराज्यातील व्यापाऱ्याकडून करडीला मागणी होत असल्याने दरवाढ झाली आहे. - प्रणव बागडी, अडत व्यापारी, उदगीर जि. लातूर. 

 कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील करडई/हरभरा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/07/2025
बार्शी---क्विंटल6710071007100
जालनालोकलक्विंटल5800080008000
औराद शहाजानीनं. १क्विंटल47820188018501
लातूरसफेदक्विंटल50598090008700
18/07/2025
जालनालोकलक्विंटल13780078007800
औराद शहाजानीनं. १क्विंटल18800187518376

शेतमाल : हरभरा

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/07/2025
पैठण---क्विंटल2584058405840
काटोललोकलक्विंटल150587059355900
19/07/2025
पुणे---क्विंटल41800084008200
बार्शी---क्विंटल129545055505500
माजलगाव---क्विंटल70570060005912
राहूरी -वांबोरी---क्विंटल1550055005500
पैठण---क्विंटल2568556855685
कारंजा---क्विंटल550587561455875
रिसोड---क्विंटल180565061205900
राहता---क्विंटल7540054005400
धामणगाव -रेल्वेचाफाक्विंटल290575061106000
मलकापूरचाफाक्विंटल548500060755900
वडूजचाफाक्विंटल5565057505700
पातूरचाफाक्विंटल28565560005820
सोलापूरगरडाक्विंटल6570057005700
छत्रपती संभाजीनगरगरडाक्विंटल6420056004900
अक्कलकोटहायब्रीडक्विंटल11550055005500
जालनाकाबुलीक्विंटल4825982598259
अकोलाकाबुलीक्विंटल39660069006750
मालेगावकाट्याक्विंटल22500056485600
तुळजापूरकाट्याक्विंटल17567560005850
धुळेलालक्विंटल40350554394905
बीडलालक्विंटल1559055905590
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल66510056005350
तेल्हारालालक्विंटल90597561606070
गंगापूरलालक्विंटल2567156715671
आंबेजोबाईलालक्विंटल5605060506050
निलंगालालक्विंटल30585062505950
औराद शहाजानीलालक्विंटल57545161715910
उमरखेड-डांकीलालक्विंटल60570058005750
जालनालोकलक्विंटल594550062296000
अकोलालोकलक्विंटल683500061656015
अमरावतीलोकलक्विंटल1284565060505850
सांगलीलोकलक्विंटल50575062005975
आर्वीलोकलक्विंटल140565061105800
उमरेडलोकलक्विंटल204567060405800
मुर्तीजापूरलोकलक्विंटल180565561755915
सावनेरलोकलक्विंटल40575058655825
कोपरगावलोकलक्विंटल11565057665660
गेवराईलोकलक्विंटल19575091105850
लोणारलोकलक्विंटल32565059005775
वरोरालोकलक्विंटल1570058005750
बाभुळगावलोकलक्विंटल70565161455851
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल215570059005800
दुधणीलोकलक्विंटल10615061506150

हेही वाचा : अवर्षणाच्या फेऱ्यात मिळाली रेशीम शेतीची भक्कम साथ; कुप्पाच्या शेतकऱ्याने ७० गुंठ्यांत घेतले दहा लाखांचे उत्पन्न

टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेती क्षेत्रपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीपीकलातूरमराठवाडाविदर्भ