मुंबई : यंदाच्या खरिपातील सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी गुरुवारपासून नोंदणी सुरू होणार असून १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच पणन महामंडळ बारदाना खरेदीची प्रक्रिया राबविणार असून यंदा त्याचा तुटवडा भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावर्षी सोयाबीन १८ लाख ५० हजार मेट्रिक टन, मूग ३ लाख ३० हजार आणि उडीद खरेदीसाठी ३२ लाख ५६ हजार क्विंटल खरेदीसाठी केंद्र सरकारने उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे.
hamibhav soybean kharedi kendra मागील सोयाबीन खरेदीसाठी ५६५ खरेदी केंद्रे होती, यंदा ही संख्या दुप्पट करण्यात येईल.
खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ आणि कृषी पणन मंडळ यांची नोडल संस्था म्हणून नियुक्ती केल्याचेही ते म्हणाले.
दक्षता पथकाची नजर
हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करून तोच माल खरेदी केंद्रावर विकला जाण्याची शक्यता गृहीत धरून त्यावर नजर ठेवण्यासाठी तसेच खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष, दक्षता पथक स्थापन केले आहे.
३ लाख ७५ हजार नोंदणी
हमीभावाने कापूस खरेदीसाठी १ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ३.७५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी १२४ खरेदी केंद्रे होती, यावर्षी ती वाढवून १७० केली आहेत.
अधिक वाचा: राज्यात अजून किती दिवस पावसाचा अंदाज; कधीपासून सुरु होणार थंडी? वाचा सविस्तर
