पुणे : गणेशोत्सवातील गौरीच्या पूजनासाठी गुलटेकडी मार्केटयार्ड फळ बाजारातडाळिंब, सफरचंद फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यास अधिक मागणी वाढत आहे.
सध्या दिवसाला बाजारात ८० ते ९० टन फळांची आवक होत आहे. यामध्ये ३५ ते ४० टन आवक डाळिंबाची आवक असून सफरचंदाची ३० ते ३५ टन आवक झाली आहे.
पावसाळ्यामध्ये फळांचे उत्पादन कमी होत असले तरी गणेशोत्सवात गौरीच्या पूजनासाठी डाळिंबाला सर्वाधिक पसंती ग्राहकांकडून होत आहे.
आयात फळांमध्ये विविध विभागातून बाजार समितीत फळे विक्रीसाठी येत आहेत. साथीच्या आजारांमुळे डॉक्टरही फळे खाण्याचा सल्ला देत असतात.
फळांचे प्रकार प्रतिकिलो दरडाळिंब - १८० ते २५०सफरचंद - १५० ते १८०मोसंबी - ८० ते १००चिक्कू - ५० ते ६०केळी - ४० ते ६० रुपये डझन
मागील आठवड्याच्या तुलनेत गौरींच्या पूजनासाठी शुक्रवारी डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून चांगल्या प्रकारच्या डाळिंबांना १८० ते २५० भाव होता. त्याबरोबर १५० ते २०० दर होता. - सत्यजित झेंडे, व्यापारी
अधिक वाचा: Farmer id : फार्मर आयडी मिळाले पण अॅग्रीस्टॅक योजनेच्या इतर सुविधांचा लाभ कधी मिळणार?