सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या फळांच्या विक्रीमध्ये विक्रमाची नोंद होत आहे. विशेषतः सीताफळ, पेरू, सफरचंद यांची आवक वेगाने वाढत असून, त्यावर ग्राहकांची मोठी मागणी आहे. त्यामुळे दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात असल्याने बाजारात गर्दी वाढली आहे.
सध्या बाजारात गोल्डन सीताफळ ४० ते ८० रुपये आणि गावराण सीताफळ ८० ते १२० रुपये प्रतिकिलो दरात उपलब्ध आहे. पेरूचे दर मात्र अत्यंत कमी होऊन १० ते ४० रुपये प्रतिकिलो इतके असले तरी ग्राहकांची मागणी वाढली आहे.
सीताफळांची आवक वाढली, दरही परवडणारे
स्थानिक ग्रामीण भागांसोबतच शेजारच्या हैदराबाद आणि बार्शी परिसरातून सीताफळे मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत येत आहेत. यामुळे दरांवर परिणाम झाला आहे. सध्या बाजारात गोल्डन सीताफळ ४० ते ८० रुपये आणि गावराण सीताफळ ८० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. दर परवडणारे असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर सीताफळांची खरेदी करत आहेत.
म्हणून दर कमी
राज्यभर पेरूच्या लागवडीत झालेली झपाट्याने वाढ आणि त्यामुळे बाजारात जास्त प्रमाणात पेरूची आवक होणे आहे. मागील काही वर्षांत शेतकऱ्यांनी तैवान पिंक, व्हीएनआर, रेड डायमंड अशा विविध जातींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली असून, आता त्यांचा माल बाजारात मोठ्या प्रमाणात येत परिणामी दर कमी झालेत.
बाजारातील हालचाल
श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी २४ क्विंटल सीताफळ दाखल झाले. याचा किमान भाव १४००, तर दर्जानुसार जास्तीत जास्त ६ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका होता. पेरूची २०६ क्विंटल आवक झाली असून, दर मात्र ५०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिला.
किरकोळ बाजारातील दर (प्रति किलो)
- गोल्डन सिताफळ - ४० ते ८० रुपये
- गावरान सिताफळ - ८० ते १२० रुपये
- सफरचंद - ८० ते १२० रुपये
- पेरू - १० ते ४० रुपये
- डाळिंब - ६० ते १२० रुपये