Join us
Daily Top 2Weekly Top 5

६०० रुपयांनी घसरले कापसाचे भाव; गेल्या तीन दिवसांपासून कापसाच्या भावात घसरण सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:29 IST

Cotton Market Rate : गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत प्रति क्विंटल ६०० रुपयांनी कापसाचे भाव घसरले असून, बाजारासह खेडा खरेदीत कापसाला प्रति क्विंटल आठ हजार रुपये भाव मिळत असल्याचे वास्तव आहे.

अकोला जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत प्रति क्विंटल ६०० रुपयांनी कापसाचे भाव घसरले असून, बाजारासह खेडा खरेदीत कापसाला प्रति क्विंटल आठ हजार रुपये भाव मिळत असल्याचे वास्तव आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीदरानुसार भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) जिल्ह्यातील केंद्रांवर कापूस खरेदी केली जात आहे.

मात्र हमीदराच्या तुलनेत बाजारात खासगी पद्धतीने आणि गावस्तरावरील खेडा खरेदीत कापसाला अधिक दर मिळत असल्याने गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी 'सीसीआय'च्या कापूस खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवत बाजारात खासगी पद्धतीने आणि गावात कापूस विकण्याकडे कल वाढवला आहे.

आठवड्यात गेल्या कापसाला प्रति क्विंटल ८ हजार ६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. परंतु, गेल्या तीन दिवसांपासून कापसाच्या भावात घसरण होत असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात खासगी पद्धतीने आणि खेडा खरेदीत कापसाला प्रति क्विंटल आठ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

कापूस हंगाम आटोपण्याच्या मार्गावर!

जिल्ह्यातील यंदाचा कापूस हंगाम आता आटोपण्याच्या मार्गावर असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून कापसाच्या भावात घसरण सुरू झाली असून, प्रति क्विंटल ६०० रुपये कमी मिळत आहेत. मात्र गरज भागवण्यासाठी मिळत असलेल्या भावात शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : परिस्थितीशी झुंज देत विजयालक्ष्मी यांची दुग्धव्यवसायात भरारी; आता महिन्याकाठी १ लाख रुपयांची कमाई

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton Prices Plunge ₹600; Decline Continues for Three Days

Web Summary : Cotton prices in Akola district have fallen by ₹600 per quintal in the last three days. Farmers are selling privately due to better rates than government centers, despite the season nearing its end. Many farmers are forced to sell at lower prices to meet immediate needs.
टॅग्स :कापूसबाजारमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतकरीविदर्भमराठवाडा