अलीकडेच कोथिंबिरीच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची अवस्था कठिण झाली आहे. नाशिक जिल्ह्याच्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या २५ ऑगस्ट रोजी कोथिंबिरीच्या १०० जुड्यांना मिळालेला किमान भाव ६८५ रुपये होता. दोन सप्टेंबर रोजी हाच भाव २६० इतका खाली आल्याचे दिसून आले. दरातील ही घसरण ६३ टक्क्यांची आहे.
२५ ऑगस्ट रोजी १०० जुड्यांचा किमान भाव ६८५, कमाल १०००, सरासरी दर ७३० इतका मिळाला. २६ ऑगस्ट रोजी किमान ४००, कमाल दर १११० इतका होता. २८ ऑगस्ट रोजी किमान ५००, तर कमाल १३०५ होता. २९ ऑगस्ट रोजी किमान २५०, तर कमाल १३५५ इतका होता.
३१ ऑगस्ट रोजी किमान ५०५, तर कमाल ११०० इतका होता. १ सप्टेंबर रोजी किमान ६५०, तर कमाल १५००. २ सप्टेंबर रोजी किमान २६०, तर कमाल ७५० रुपये इतका दर होता. ऑगस्ट महिन्यात सात वेळेस १०० जुड्यांना किमान फक्त १०० रुपये मिळाले आहेत.
ऑगस्ट महिन्यात १७ वेळेस १०० जुड्यांना किमान ३०० पेक्षा कमी रुपये मिळाले आहेत. तर २५ ऑगस्ट रोजी सर्वाधिक १८०० रुपये कमाल मिळाले आहेत. कोथिंबीर दरातील घसरणीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून एका शेतकऱ्याने कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिली. आवक कायम असल्याने दर आणखी घसरण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले.
जास्तीत जास्त कृषी माल हा किमान भावाच्या आसपास किमतीतच विकला जातो. अगदी २०, ते २५ टक्क्यांनाच कमाल भाव मिळतो. - प्रवीण खरोळे, शेतकरी, मनमाड.
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र