Lokmat Agro >बाजारहाट > Copra Market : वातावरणातील बदलामुळे खोबरा उत्पादनात घट; दरात झाली मोठी वाढ

Copra Market : वातावरणातील बदलामुळे खोबरा उत्पादनात घट; दरात झाली मोठी वाढ

Copra Market : Copra production declines due to climate change; prices increase sharply | Copra Market : वातावरणातील बदलामुळे खोबरा उत्पादनात घट; दरात झाली मोठी वाढ

Copra Market : वातावरणातील बदलामुळे खोबरा उत्पादनात घट; दरात झाली मोठी वाढ

यंदा नारळाच्या उत्पादनात झालेली घट, तापमानातील बदल, भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केलेला साठा आणि नारळाची वाढती मागणी या कारणांमुळे सध्या बाजारपेठेत नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

यंदा नारळाच्या उत्पादनात झालेली घट, तापमानातील बदल, भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केलेला साठा आणि नारळाची वाढती मागणी या कारणांमुळे सध्या बाजारपेठेत नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यंदा नारळाच्या उत्पादनात झालेली घट, तापमानातील बदल, भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केलेला साठा आणि नारळाची वाढती मागणी या कारणांमुळे सध्या बाजारपेठेत नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

गेल्या महिनाभरात नारळाच्या-खोबऱ्याच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली, तर वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट सुरू आहे. त्यामुळे नारळाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

नारळाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आर्थिक भुर्दंड बसला आहे. तसेच अनेक ठिकाणी नारळाला मोठी मागणी असते. त्याच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे धार्मिक कार्याचा खर्च वाढला आहे.

खोबऱ्याच्या दरवाढीची कारणे
गेल्या महिन्यात दक्षिण भारतात खोबऱ्याचं उत्पादन घटले, हवामान प्रतिकूल ठरले आणि व्यापाऱ्यांनी साठवणूक केल्यामुळे पुरवठा कमी झाला. यामुळे मागणी वाढून दरात तब्बल ६० रुपयांची झपाट्याने वाढ झाली.

खोबऱ्याच्या दरात जानेवारीपासून वाढ
महिना - दर (प्रतिकिलो)

जानेवारी - १८५ रुपये
फेब्रुवारी - १९५ रुपये
मार्च - २२० रुपये
एप्रिल - २२० रुपये
मे - २५० रुपये
जून - ३५० रुपये

खोबऱ्याची आयात कुठून होते?
-
देशात दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ, तमीळनाडू, आंध प्रदेश येथून खोबऱ्याचा पुरवठा होतो.
- तसेच शेजारील श्रीलंका, फिलिपाईन्स, इंडोनेशिया या देशातून खोबऱ्याची आयात होते.
- सध्या मालाचा तुटवडा असल्याने व मागणी वाढत असल्याने खोबऱ्याचे दर चढेच राहतील, असे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
- जानेवारी महिन्यापासून खोबऱ्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
- जानेवारीत खोबऱ्याचा दर १८५ रुपये किलो होता. तो जून अखेरीस ३५० रुपयांवर पोहचला आहे.

अधिक वाचा: शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात?

Web Title: Copra Market : Copra production declines due to climate change; prices increase sharply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.