Lokmat Agro >बाजारहाट > अतिवृष्टीमुळे नारळाच्या दरात तेजी, मुग बाजार मात्र मंदावले; वाचा शेतमाल बाजारातील घडामोडी

अतिवृष्टीमुळे नारळाच्या दरात तेजी, मुग बाजार मात्र मंदावले; वाचा शेतमाल बाजारातील घडामोडी

Coconut prices rise due to heavy rains, but the moong market slows down; Read developments in the agricultural market | अतिवृष्टीमुळे नारळाच्या दरात तेजी, मुग बाजार मात्र मंदावले; वाचा शेतमाल बाजारातील घडामोडी

अतिवृष्टीमुळे नारळाच्या दरात तेजी, मुग बाजार मात्र मंदावले; वाचा शेतमाल बाजारातील घडामोडी

Agriculture Market Update : बाजारपेठेत नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांनी चांगली गर्दी केली आहे. सप्टेंबर महिन्यासाठी सरकारने साखरेचा कोटा २३ लाख ५० हजार टन इतका जाहीर केला आहे.

Agriculture Market Update : बाजारपेठेत नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांनी चांगली गर्दी केली आहे. सप्टेंबर महिन्यासाठी सरकारने साखरेचा कोटा २३ लाख ५० हजार टन इतका जाहीर केला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

संजय लव्हाडे 

जालना बाजारपेठेत नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांनी चांगली गर्दी केली आहे. सप्टेंबर महिन्यासाठी सरकारने साखरेचा कोटा २३ लाख ५० हजार टन इतका जाहीर केला आहे. अतिवृष्टीमुळे नारळ महागले असून, सोन्या-चांदीच्या दरात ऐतिहासिक तेजी आली आहे.

गणेश उत्सव आणि गौरी आगमनानिमित्त बाजारपेठेत तसेच खाद्य पदार्थांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे अतिवृष्टीमुळे नारळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यात तेजी आली आहे. नारळाचे ६० भरती पोते १७५९ रुपये आणि १०० भरतीचे पोते ३००० रुपयांना मिळत आहे. दिवसांत सणासुदीच्या खाद्यतेलदेखील भडकले आहे. खाद्य तेलात क्विंटलमागे सरासरी १०० रुपयांची तेजी आली.

दरम्यान साखरेच्या दरात तेजीची शक्यता नसून जालना बाजारपेठेत सध्या साखरेचे दर ४२०० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तसेच समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा मुगाची लागवड यंदा मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, आता काढणीच्या वेळी अतिवृष्टीमुळे मूग हातचा गेला आहे.

सोने चांदीच्या दरात ऐतिहासिक तेजी

• सध्या सोन्याच्या दरात ऐतिहासिक तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सतत बदलत असलेली परिस्थिती, ट्रम्प टैरिफचा परिणाम, रशिया युक्रेन यांच्यातील युद्धजन्य स्थिती, अमेरिकेतील फेडरल बँकेकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता आणि डॉलरच्या तुलनेत घसरलेला भारतीय रुपया हे देखील यामागील मोठे कारण असू शकते.

• सोन्या-चांदीतील ही भाव वाढ तात्पुरती नसून जागतिक परिस्थिती स्थिर होईपर्यंत हे दर तेजीतच राहतील असे जाणकारांचे मत आहे जालना बाजारपेठेत सोन्याचा भाव १ लाख ४ हजार रुपये प्रति तोळा आणि चांदीचे दर १ लाख २१ हजार रुपये किलो असे आहेत.

मुगाच्या दरात घसरण

यंदा मुगाचे चांगले उत्पादन होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती; परंतु डागाळलेल्या मुगाच्या दरात घसरण झाली आहे. नवीन मूग बाजारात येणे सुरू झाले असून, दररोज २०० पोत्यांची आवक आहे भाव ४५०० ते ८३०० रुपये प्रतिक्विंटल आहे.

जालना बाजारातील शेतमाल बाजारभाव

गहू : २५०० ते ५०००

ज्वारी : २००० ते ३५००

बाजरी : २०५० ते २८५०

तूर : ५१०० ते ६८००

हरभरा : ५००० ते ५९४०

मूग : ४५०० ते ८३००

उडीद : ४७०० ते ६५००

सूर्यफूल : ५१०० ते ५२५०

सोयाबीन : ३७०० ते ४४७५

पामतेल : १३३००

सुर्यफूल तेल : १५०००

सोयाबीन तेल : १३१००

करडी तेल : ३५०००

गूळ : ४२०० ते ५१००

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र

Web Title: Coconut prices rise due to heavy rains, but the moong market slows down; Read developments in the agricultural market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.