नावीन्यपूर्ण पीक म्हणून ओळख मिळवत असलेल्या चियाच्या दरातील घसरण कायम आहे. गेल्या पंधरा दिवसात चियाच्या दरात क्विंटलमागे १ हजार ३५० रुपयांची घसरण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये या शेतमालास १५ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या दरात सतत घसरण होत आहे. प्रामुख्याने हळद आणि चियाच्या दरात सतत घसरण होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी तेजीत असलेल्या हळदीचे दर घसरले असतानाच चियाच्या दरातही घसरण सुरू झाली आहे. वाशिम आणि बाजार समितीत चियाची खरेदी सुरू आहे.
फेब्रुवारीत चियाचे दर थेट १६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आले. आता मात्र चियाच्या दरात घसरण होत असल्याचे दिसत आहे. शनिवार, ७ मार्चला रिसोड बाजार समितीत चियाला कमाल १५ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल, तर शनिवार ७ मार्चला वाशिम बाजार समितीत चियाला किमान १३ हजार ३०० ते कमाल १५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला. आठवडाभरातच चियाच्या दरात आणखी ३५० रुपयांची घसरण होऊन चियाचे दर १५ हजार २५० रुपये प्रतिक्विंटलवरच आले.
आवक वाढली!
शनिवार, ७ मार्चला वाशिम बाजार समितीत १ हजार ५०० क्विंटल चियाची आवक झाली होती; मात्र दरात घसरण दिसल्यानंतरही शेतकऱ्यांनी विक्रीवर भर दिला. परिणामी, वाशिम बाजार समितीत शुक्रवार, १३ मार्चला २,७०० क्विंटल आवक झाली होती.
आठवडाभरात दरात झालेली घसरण
| दिनांक | किमान दर | कमाल दर |
| ७ मार्च | १३,३५० | १५,६०० |
| १३ मार्च | १३,२०० | १५,२५० |
Web Summary : Chia seed prices are falling in Washim markets. Prices have dropped by ₹1350 per quintal in the last fifteen days, causing disappointment among farmers. Increased supply hasn't helped, with prices now around ₹15,250 per quintal.
Web Summary : वाशिम बाजारों में चिया के बीज की कीमतें गिर रही हैं। पिछले पंद्रह दिनों में कीमतों में ₹1350 प्रति क्विंटल की गिरावट आई है, जिससे किसानों में निराशा है। बढ़ी हुई आपूर्ति से मदद नहीं मिली है, कीमतें अब लगभग ₹15,250 प्रति क्विंटल हैं।