Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > केंद्र सरकारचा जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर; साखरेचे भाव वाढतील का?

केंद्र सरकारचा जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर; साखरेचे भाव वाढतील का?

Central government announces sugar sales quota for June; Will sugar prices increase? | केंद्र सरकारचा जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर; साखरेचे भाव वाढतील का?

केंद्र सरकारचा जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर; साखरेचे भाव वाढतील का?

Sugar Quota 2025 केंद्र सरकारने जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर केला आहे. देशातील साखर कारखान्यांसाठी २३.५० लाख टन साखर विक्री करता येणार आहे.

Sugar Quota 2025 केंद्र सरकारने जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर केला आहे. देशातील साखर कारखान्यांसाठी २३.५० लाख टन साखर विक्री करता येणार आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारने जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर केला आहे. देशातील साखर कारखान्यांसाठी २३.५० लाख टन साखर विक्री करता येणार आहे.

मात्र, बाजारात साखरेला मागणी नसल्याने मे महिन्याच्या कोट्यातील सुमारे ५० हजार टन साखर कारखान्यांकडे शिल्लक आहे.

बाजारातील साखरेचे दर नियंत्रित राहावे, यासाठी साखर कारखान्यांना साखर विक्रीसाठी महिन्याला कोटा देते. तेवढीच साखर विक्री करता येते.

गेल्या वर्षी जूनमध्ये २५.५० लाख टन विक्रीचा कोटा दिला होता. मात्र, यंदा दोन लाख टनाने कमी दिला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत साखरेची मागणी कमी होते.

शीतपेयासाठी वापरली जाणारी साखरेची मागणी कमी होते, त्याचा परिणामही विक्री होतो. त्यात, आगामी गळीत हंगामात उसाचे बंपर पीक येण्याची शक्यता असल्याने साखरेचे उत्पादन वाढणार आहे.

देशात १३० लाख टन साखर शिल्लक
देशातील साखर कारखान्यांकडे १३० लाख टन साखर शिल्लक आहेत. ऑक्टोबरपासून नवीन हंगाम सुरू होणार आहे.

केंद्र सरकारने कोटा दिला असला तरी बाजारात साखरेची मागणी अपेक्षित नाही. त्यामुळेच मे महिन्यातील साखर कारखान्यांकडे शिल्लक आहे, बाजारातील साखरेचे भाव वाढण्याची शक्यता कमी असून, सध्याचा प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर स्थिर राहू शकतो. - पी. जी. मेढे, साखर उद्योग अभ्यासक

अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या उसाची बिले का मिळत नाहीत? काय आहेत कारखानदारांच्या अडचणी? वाचा सविस्तर

Web Title: Central government announces sugar sales quota for June; Will sugar prices increase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.