Join us

Bor Bajar Bhav : आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू; कोणत्या बोराला मिळतोय किती भाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 14:58 IST

आंबट-गोड बोरं म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात होणारी बोरांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढली आहे.

पुणे : आंबट-गोड बोरं म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात होणारी बोरांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढली आहे.

आवक आणखी वाढत जाणार असल्याची माहिती व्यापारी रवींद्र शहा यांनी दिली. पंधरा दिवसांपासून बोरांची आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला तुरळक असणारी आवक आता वाढली आहे.

मार्च अखेरपर्यंत ही आवक सुरू राहील. मार्केट यार्डातील फळ बाजारात दररोज दोन ते अडीच हजार पोती आवक होत आहे. सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यांसह राजस्थान येथून आवक होत आहे.

सध्या ढगाळ वातावरणामुळे उत्पादन अधिक झाले आहे. या बोरांना शहर आणि उपनगरांतील विक्रेत्यांसह पाचगणी, महाबळेश्वर, लोणावळा, कोकणासह पर्यटनस्थळांच्या ठिकाणांहून मागणी असल्याचेही व्यापारी रवींद्र शहा सांगितले.

बोर प्रकार : भावचमेली : २०० ते २५०उमराण : ८ ते १००चेकनेट : ६०० ते ७००चन्यामन्या : ५५० ते ७००

अधिक वाचा: Mosambi Ambiya Bahar : मोसंबी पिकात अधिक फळ लागण्यासाठी झाडांना कसा द्याल ताण; वाचा सविस्तर

टॅग्स :बाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणेअहिल्यानगरसोलापूरफळे