सोलापूर : गुलाबी थंडीचा कडाका वाढताच फळबाजाराचे 'ऋतुचक्र' पूर्णपणे बदलले आहे. बाजारातसोलापूरकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता दोन 'सफरचंद' आमनेसामने आले आहेत.
एक म्हणजे आरोग्यासाठी उत्तम असलेले लालचुटूक सफरचंद आणि दुसरे म्हणजे जिभेचे चोचले पुरवणारे हिरवेगार 'अॅपल बोर'!
सोमवार, १५ डिसेंबर रोजी सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक २२६ क्विंटल लोकल बोराची आवक झाली.
आतापर्यंत बाजारात केवळ चेकनेट बोरं दिसत होती; पण आता आकाराने मोठ्या आणि चवीला गोड अशा अॅपल बोरांनी किरकोळ बाजारात दमदार एन्ट्री केली आहे.
ही बोरं ६० ते ८० रुपये किलो दराने उपलब्ध असल्याने महागड्या सर्वसामान्यांकडून सफरचंदापेक्षा या 'देशी अॅपल'ला पसंती दिली जात आहे.
दुसरीकडे, थंडावा वाढल्याने कलिंगडाची मागणी आणि आवक तळाला गेली आहे. थोडक्यात, थंडीच्या या हंगामात रसाळ फळांपेक्षा गर असलेल्या पौष्टिक फळांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
येथून अॅपल बोरांची आवक◼️ सोलापूर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून, विशेषतः मोहोळ, बार्शी आणि पंढरपूर भागातून अॅपल बोराची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे.◼️ साध्या बोरांपेक्षा अॅपल बोरांचा आकार सफरचंदासारखा मोठा असतो आणि चव अत्यंत गोड व कुरकुरीत असते. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण याला पसंती देत आहेत.
अधिक वाचा: युटोपियन आणि भैरवनाथ साखर कारखान्यांचा सुधारित ऊस दर अखेर जाहीर? कसा दिला दर?
Web Summary : Solapur's fruit market sees Apple Ber gaining popularity over apples due to its affordability (₹60-80/kg). Local Apple Ber from Mohol, Barshi, and Pandharpur are in high demand for their sweet, crisp taste. Watermelon demand declines due to the cold.
Web Summary : सोलापुर के फल बाजार में सेब की तुलना में ऐपल बेर की लोकप्रियता बढ़ रही है, क्योंकि यह सस्ता (₹60-80/किलो) है। मोहोळ, बार्शी और पंढरपुर से स्थानीय ऐपल बेर की मिठास और कुरकुरे स्वाद के कारण बहुत मांग है। ठंड के कारण तरबूज की मांग घट रही है।