कोल्हापूर : अकोला (वासुद, ता. सांगोला) येथील पांडुरंग आसबे यांच्या 'ब्लॅक डायमंड' पेरूची आवक कोल्हापूरशेती उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच झाली आहे.
सध्या पेरूचे दर घसरलेले असताना या पेरूला प्रतिकिलो १०१ रुपये दर मिळाला. पांडुरंग आसबे यांनी थायलंड ब्लॅक डायमंडची रोपे आणून लागवड केली होती. त्याचे उत्पादन सध्या सुरू झाले आहे.
त्याची आवक बाजार समितीच्या इरफान बागवान व मोहसीन बागवान यांच्याकडे झाली आहे. बागवान यांच्या अडत दुकानात आलेले पेरू लिलावात प्रसाद नंदकुमार वळंजू यांनी खरेदी केले. नितीन सूर्यवंशी, तेजस डोके, संभाजी चिले, राजू शिंदे, धनाजी कुंभार, आदी उपस्थित होते.
ब्लॅक डायमंड पेरूची वैशिष्ट्ये▪️हा पेरू बाहेरून व आतून एकदम लाल आहे. तसेच त्याचे झाडदेखील लाल आहे.▪️बियांचे प्रमाणदेखील अतिशय कमी असून इतर पेरूपेक्षा गोडी आणि टिकवण क्षमता उत्कृष्ट असल्यामुळे मार्केटमध्ये चांगली मागणी व उठाव होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.