Join us

Bhusar Mal Bajar Bhav : लग्नसराईमुळे बाजारात भुसार मालाची आवक अन् विक्रीही वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:57 IST

३० डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत पौष महिना असल्याने तारखा असूनही लग्नकार्ये झाली नाहीत. मात्र, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोठ्या तारखा असल्याने इकडे बाजारात विक्रीसाठी सोयाबीन, तूर, मूग, हरभरा व इतर धान्यांची आवक वाढली आहे.

योगेश गुंडकेडगाव : ३० डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत पौष महिना असल्याने तारखा असूनही लग्नकार्ये झाली नाहीत. मात्र, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोठ्या तारखा असल्याने इकडे बाजारात विक्रीसाठी सोयाबीन, तूर, मूग, हरभरा व इतर धान्यांची आवक वाढली आहे.

अहिल्यानगर बाजार समितीच्या भुसार विभागात दिवसाला सरासरी दीड हजार क्विंटल आवक होत आहे. मुला-मुलींच्या लग्नकार्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, तूर राखून ठेवले होते. मात्र, दर वाढला नाही.

मुला-मुलींचे लग्न तोंडावर आल्याने राखीव ठेवलेले सोयाबीन व इतर धान्य विक्रीला काढले जात आहे. त्यामुळेच बाजारात धान्याची आवक असल्याचे दिसत आहे.

२३ जानेवारीला अहिल्यानगरच्या बाजार समितीत १२६५ क्विंटल आवक होती. मागील महिन्यात एवढी मोठी आवक नव्हती; परंतु आता लग्नसराई येत असल्याने खरेदीला पैसा लागतो म्हणून सोयाबीन व इतर धान्य बेभावात विकावे लागत आहे.

अशी आहे शेतमालाची आवक व दर

शेतमालकिमान दरकमाल दरआवक
तूर६०००७१००७१५
हरभरा५६००६०००५३
मूग६४००७१००१०
उडीद५५००६५००८१
गहू२५००३३००४८
सोयाबीन३५५०४१००७१

तुरीची ७०० क्विंटल आवकसध्या बाजारात तुरीची आवक बऱ्यापैकी आहे. अहिल्यानगर बाजार समितीत तुरीची ७०० ते ८०० क्विंटल आवक सुरू आहे. याला ६ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर आहे. तुरीचीही आवक बाजारात लग्नसराईमुळेच आहे.

अधिक वाचा: Tur Bajar Bhav : अक्कलकोट बाजार समितीत ३८ हजार क्विंटल तुरीची आवक; मिळतोय सर्वाधिक दर

टॅग्स :मार्केट यार्डबाजारशेतकरीलग्नइंदापूरअहिल्यानगरतूरहरभरासोयाबीनगहूमूग