Bhuimug Shenga Market : हिंगोलीच्या मोंढा बाजारपेठेत मागील आठवड्याभरापासून भुईमूग शेंगाची आवक लक्षणीय वाढली आहे. सध्या दररोज सरासरी २५० ते ३०० क्विंटल शेंगांची आवक होत आहे. (Bhuimug Shenga Market)
मात्र, बाजारात मिळणारा ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. (Bhuimug Shenga Market)
गतवर्षी समाधानकारक पावसाळ्यानंतरही फेब्रुवारी महिन्यात भूगर्भातील पाणीपातळीत मोठी घट झाल्याने उन्हाळी भुईमूग पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. परिणामी, उत्पादनात घट झाली. अशा स्थितीत शेतकऱ्यांना समाधानकारक दर न मिळाल्याने भाववाढीची प्रतीक्षा करत आहेत. (Bhuimug Shenga Market)
सध्या बाजारात किमान ५ हजार ते कमाल ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, शेतकऱ्यांची अपेक्षा किमान ६ हजार रुपये दर मिळण्याची आहे. दर स्थिर असल्याने उत्पादक निराश आहेत.
दरम्यान, हळदीच्या दरात महिनाभरात जवळपास २ हजार रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसत आहे.
मागील वर्षी, हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमूग शेंगांना (सुकी) प्रतिक्विंटल किमान ५ हजार २०० रुपये, कमाल ६ हजार रुपये आणि सरासरी ५ हजार ७०० रुपये दर मिळत होता.
तसेच, जुलै २०२४ मध्ये भुईमूग शेंगांची आवक १ हजार ३०० क्विंटल झाली होती, आणि त्या वेळी प्रतिक्विंटल किमान ४ हजार ८०० रुपये ते कमाल ६ हजार ६८० रुपये दर मिळाला होता, सरासरी दर सुमारे ५ हजार ७४० रुपये इतका मिळाला होता.
या तुलनेत, २०२५ मध्ये भुईमूग शेंगांना प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ३०० रुपये दर मिळत आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. भुईमूग लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत बाजारात मिळाणार दर हा कमी असून, त्यांना किमान ६ हजार रुपये दराची अपेक्षा आहे.
राज्यातील इतर बाजारपेठेत भुईमूगाची किती आवक झाली आणि कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर
दिनांक | बाजार समिती | जात/प्रकार | आवक (क्विंटल) | किमान भाव (₹) | कमाल भाव (₹) | सरासरी भाव (₹) |
---|---|---|---|---|---|---|
15/05/2025 | अमरावती | लोकल | 137 | ₹5500 | ₹6000 | ₹5750 |
15/05/2025 | धुळे | एस.बी ११ | 205 | ₹3500 | ₹6200 | ₹6000 |
15/05/2025 | लासलगाव | --- | 7 | ₹3500 | ₹3700 | ₹3700 |
15/05/2025 | धाराशिव | लोकल | 7 | ₹3000 | ₹4600 | ₹3800 |
15/05/2025 | नागपूर | लोकल | 30 | ₹5000 | ₹6000 | ₹5750 |
15/05/2025 | छत्रपती संभाजीनगर | --- | 15 | ₹3500 | ₹4000 | ₹3750 |
15/05/2025 | करमाळा | --- | 1 | ₹5600 | ₹5900 | ₹5900 |